२. “सुज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वार्याने भरील काय?
३. निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय?
४. तू तर देवाचे भय सोडले आहेस; तू देवचिंतनाचा संकोच करतोस.
५. तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलण्यास शिकवतो; तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते.
६. तुझेच तोंड तुला दोषी ठरवत आहे, मी नाही; तुझ्याच मुखावाटे तुझ्याविरुद्ध साक्ष निघत आहे.
७. पहिला पुरुष असा तूच जन्मलास काय? पर्वतांपूर्वी तुझी उत्पत्ती झाली काय?
८. देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूच घेतला आहेस काय?
९. आम्हांला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे? आम्हांला अवगत नाही अशी तुला काय माहिती आहे?
१०. पिकलेल्या केसांचे, वयाने वृद्ध, तुझ्या बापाहून अधिक वयाचे असे पुरुष आमच्यात आहेत.
११. देवाने केलेले सांत्वन आणि तुझ्याशी केलेली सौम्य भाषणे तुला तुच्छ वाटतात काय?
१२. तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवतोस?
१३. तुझ्या संतापाचा रोख देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस?
१४. मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार?
१५. पाहा, देव आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरीत नाही; आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही.
१६. तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा!
१७. मी तुला समजावून सांगतो; माझे ऐकून घे; मी जे स्वतः पाहिले आहे ते तुला निवेदन करतो;
१८. (ह्या गोष्टी ज्ञान्यांनी आपल्या वाडवडिलांपासून ऐकून सांगितल्या, गुप्त ठेवल्या नाहीत;
१९. त्यांनाच काय तो देश दिला होता; कोणा परक्याचा त्यात प्रवेश होत नव्हता;)
२०. दुर्जन जन्मभर आणि जुलमी मनुष्य त्याची आयुष्यमर्यादा संपेपर्यंत यातना भोगतो.
२१. दहशतीचा शब्द त्याच्या कानात घुमत असतो; भरभराटीच्या काळात विध्वंसक त्याच्यावर चालून येईल.
२२. अंधारातून परत येण्याची त्याला आशा नसते; तलवार त्याच्यावर टपलेली असते.
२३. अन्नान्न करीत तो चोहोकडे भटकतो. अंधकारमय दिवस आपल्यासमीप आहे हे त्याला ठाऊक आहे;
२४. संकट व क्लेश ही त्याला घाबरवतात; लढाईस सज्ज झालेल्या राजासारखी ती त्याला घेरतात;
२५. कारण त्याने देवावर हात उचलला आहे, व सर्वसमर्थाशी उद्दामपणा केला आहे.
२६. त्याने आपली मान ताठ करून, आपल्या ढालीची जाड बोंडे पुढे करून त्याच्यावर हल्ला केला आहे;
२७. त्याच्या तोंडावर चरबी चढली आहे; त्याच्या कंबरेत चरबी जमली आहे.
२८. ओसाड नगरात, राहण्यास अयोग्य अशा घरात, ओस व्हावे म्हणून सोडलेल्या जागेत तो राहत आहे.
२९. तो धनवान व्हायचा नाही, त्याची मत्ता टिकायची नाही; त्याची पिके भाराने भूमीपर्यंत लवणार नाहीत.
३०. अंधारातून त्याची सुटका होणार नाही; ज्वाला त्याच्या फांद्या सुकवील; तो देवाच्या मुखश्वासाने नाहीसा होईल.
३१. त्याने स्वतःला फसवून निरर्थक गोष्टीवर भरवसा ठेवू नये; कारण अनर्थ हेच त्याला प्रतिफळ मिळेल.
३२. त्याचा काळ येण्यापूर्वीच ते तो भोगील; त्याची झावळी हिरवी राहणार नाही.
३३. द्राक्षांप्रमाणे त्याची अपक्व फळे झडतील; जैतून झाडाच्या फुलांप्रमाणे त्याची फुले गळतील.
३४. देवहीनांचा परिवार फलहीन होईल; लाच घेणार्यांचे डेरे अग्नी भक्षील.
३५. त्यांना अपकाराचा गर्भ राहून ते अरिष्टास जन्म देतात; त्यांच्या पोटात कपट उद्भवते.”
१. मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,
२. “असल्या गोष्टी मी पुष्कळ ऐकल्या आहेत; तुम्ही सगळे भिकार सांत्वनकर्ते आहात.
३. असल्या वायफळ शब्दांचा कधी शेवट होईल? प्रत्युत्तर करण्याची तुला कोठून स्फूर्ती झाली?
४. तुमच्यासारखे मलाही बोलता येईल; तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर मलाही तुमच्यावर वाग्जाल पसरता आले असते, तुमच्याकडे पाहून मला आपले डोके हलवता आले असते;
५. पण मी तुम्हांला आपल्या मुखाने धीर दिला असता, आपल्या स्फुरणार्या ओठांनी तुमचे सांत्वन केले असते.
६. मी बोललो तरी माझ्या शोकाचे शमन होत नाही; मी गप्प राहिलो तरी माझे दुःख कोठे कमी होत आहे?
७. पण त्याने१ मला व्याकूळ केले आहे; तू१ त्याने माझ्या सर्व परिवाराचा विध्वंस केला आहेस.
८. तू मला पकडले आहे, हीच माझ्याविरुद्ध साक्ष आहे; माझा रोडपणा माझ्यासमोर माझ्याविरुद्ध साक्षी असा उठला आहे.
९. त्याने क्रोधायमान होऊन मला फाडून टाकले आहे; त्याने माझ्याशी वैर मांडले आहे, तो माझ्यावर दातओठ खात आहे. माझा वैरी माझ्यावर डोळे वटारत आहे.
१०. लोक माझ्याकडे पाहून तोंडे विचकत आहेत; माझी निर्भर्त्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारत आहेत; ते एकत्र होऊन माझ्यावर चालून आले आहेत.
११. देवाने मला अधर्म्यांच्या स्वाधीन केले आहे. दुष्कर्म्यांच्या हाती दिले आहे.
१२. मी सुखाने राहत असता त्याने माझा चुराडा केला आहे. त्याने माझी मानगुट धरून मला आपटून माझे तुकडे केले आहेत; मला त्याने मारा करण्याचे निशाण केले आहे.
१३. त्याचे बाण माझ्यासभोवार उडत आहेत; माझी गय न करता त्याने माझी कंबर मोडली आहे; त्याने माझे पित्त जमिनीवर पाडले आहे.
१४. खिंडारावर खिंडार पाडून तो मला भग्न करतो; तो वीराप्रमाणे माझ्यावर धावून आला आहे.
१५. मी आपल्या त्वचेवर तरट शिवले आहे. मी आपले शृंग धुळीत लोळवले आहे.
१६. रडून रडून माझे तोंड लाल झाले आहे; माझ्या पापण्यांवर मृत्युच्छाया पडली आहे;
१७. माझ्या हातून काही अन्याय झाला नाही; माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे, तरी असे झाले.
१८. अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नकोस; माझ्या आरोळीस कोठेही खंड न पडो.
१९. ह्या क्षणी माझा साक्षी स्वर्गात आहे, माझा कैवारी उर्ध्वलोकी आहे.
२०. माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत; पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळत आहेत.
२१. ह्यासाठी की त्याने देवाविरुद्ध मनुष्यातर्फे व इष्टमित्रांविरुद्ध मानवपुत्रांतर्फे वाद करावा.
२२. कारण जेथून परत येता येत नाही अशा मार्गाने थोड्याच वर्षांनी मी जाणार.”
२०. न्याय करण्याच्या मिषाने, उपद्रव योजून अन्याय करणार्या न्यायासनाचा तुझ्याशी काही संबंध असेल काय?
२१. ते नीतिमानाच्या जिवावर घाला घालतात, ते निर्दोष्यांस देहान्त शिक्षा देतात;
२२. पण परमेश्वर मला उंच गडासारखा आहे; माझा देव मला आश्रयाचा दुर्ग आहे.
२३. तो त्यांची अनीती त्यांच्यावरच उलटवील; त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्यांना नाहीसे करील; आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.
२८. तुझ्या पूर्वजांनी घातलेली मेर सारू नकोस.
२९. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.
१९. मग तू म्हणशील की, “माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.”
२०. बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग;
२१. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही.
२२. देवाची ममता व कडकपणा पाहा; पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता; पण तू त्याच्या ममतेत राहशील तर; नाहीतर तूही छेदून टाकला जाशील.
२३. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे.
२४. जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेषेकरून लावण्यात येईल?
२५. बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;
२६. ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे, “मुक्त करणारा सीयोनेतून येईल; तो याकोबापासून अभक्ती दूर करील;”
२७. “जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन, तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल.”
२८. सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत.
२९. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही.
३०. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे,
३१. त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे.
३२. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे.
३३. अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!
३४. “प्रभूचे मन कोणी ओळखले अथवा त्याचा मंत्री कोण होता?”
३५. “अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?”
३६. कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide