बायबल एकाच वर्षात

१. यहूदा वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जो भाग मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सरहद्दीपर्यंत पसरला होता.
२. त्यांच्या दक्षिण सीमेस क्षार समुद्राच्या दक्षिणेकडील खाडीपासून आरंभ झाला;
३. ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे निघून सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे;
४. तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या नाल्यापर्यंत निघाली आहे; तिचा शेवट समुद्रानजीक झाला आहे; तुमची दक्षिण सीमा हीच.
५. त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्‍यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन,
६. बेथ-होग्लाच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत गेली आहे;
७. तेथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे; हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढावासमोर नदीच्या दक्षिणेस आहे. मग ती सीमा एन-शेमेश नावाच्या झर्‍याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
८. तेथून ती सीमा हिन्नोमपुत्राच्या खोर्‍यातून यबूसी चढणीच्या दक्षिण भागावर म्हणजे यरुशलेमेच्या चढणीवरून पश्‍चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तर टोकास असलेल्या पहाडाच्या माथ्यावर गेली आहे;
९. तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते.
१०. तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते;
११. तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो.
१२. पश्‍चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहूदा वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतु:सीमा होत.
१३. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहूदाच्या वंशजांबरोबर वतन दिले तेच किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन होय; हा अर्बा अनाक्यांचा मूळ पुरुष.
१४. कालेबाने शेशय, अहीमान व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांना तेथून घालवून दिले.
१५. तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
१६. कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन.”
१७. तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली.
१८. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली१ तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
१९. ती म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब दिले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या;” तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले.
२०. यहूदाच्या संतानाच्या वंशांतील कुळांप्रमाणे त्यांचे वतन हे:
२१. यहूदाच्या संतानाच्या वंशाला दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील ही नगरे मिळाली: कबसेल, एदेर व यागूर;
२२. कीना, दीमोना व अदादा;
२३. केदेश, हासोर व इथनान;
२४. जीफ, टेलेम व बालोथ;
२५. हासोरहदत्ता व करीयोथ-हेस्रोन (हेच हासोर);
२६. अमाम, शमा व मोलादा;
२७. हसरगदा, हेष्मोन व बेथ-पेलेट;
२८. हसरशुवाल, बैर-शेबा व बिजोथा;
२९. बाला, ईयीम व असेम;
३०. एल्तोलाद, कसील व हर्मा;
३१. सिकलाग, मद्मन्ना व सन्सन्ना;
३२. लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन. अशी एकंदर एकोणतीस नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.
३३. तळवटीतील नगरे ही: एष्टावोल, सरा व अषणा;
३४. जानोह, एनगन्नीम, तप्पूहा व एनाम;
३५. यर्मूथ, अदुल्लाम, सोखो व अजेका;
३६. शाराईम, अदीथईम, गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे व त्यांखालील खेडी:
३७. सनान व दहाशा व मिग्दल-गाद;
३८. दिलान, मिस्पे व यकथेल;
३९. लाखीश, बसकाथ व एग्लोन;
४०. कब्बोन, लहमाम व किथलीश;
४१. गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा, अशी सोळा नगरे व त्यांखालील खेडी.
४२. लिब्ना, एथेर व आशान;
४३. इफ्ताह, अषणा व नसीब;
४४. कईला, अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी.
४५. एक्रोन, त्याची उपनगरे व खेडी,
४६. एक्रोनाजवळची व पश्‍चिमेची अश्दोदाच्या बाजू-कडली सर्व नगरे व त्यांखालील खेडी.
४७. अश्दोद, त्याची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याची उपनगरे व खेडी; मिसरचा नाला व महासमुद्राच्या तीरावरली नगरे.
४८. आणि डोंगरवटीतली नगरे ही: शामीर, यत्तीर व सोखो;
४९. दन्ना किर्याथ-सन्ना (हेच दबीर);
५०. अनाब, एष्टमो व अनीम;
५१. गोशेन, होलोन व गिलो, अशी अकरा नगरे व त्यांखालील खेडी.
५२. अराब, दूमा व एशान;
५३. यानीम बेथ-तप्पूहा व अफेका;
५४. हुमटा, किर्याथ-अर्बा (हेच हेब्रोन) व सियोर; अशी नऊ नगरे व त्यांखालील खेडी.
५५. मावोन, कर्मेल, जीफ व यूटा;
५६. इज्रेल, यकदाम व जानोह;
५७. काइन, गिबा व तिम्ना; अशी दहा नगरे व त्यांखालील खेडी.
५८. हल्हूल, बेथ-सूर, गदोर;
५९. माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; अशी सहा नगरे व त्यांखालील खेडी.
६०. किर्याथ-बाल (हेच किर्याम-यारीम) व राब्बा; ही दोन नगरे व त्यांखालील खेडी.
६१. रानातली नगरे ही: बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
६२. निबशान, क्षारनगर व एन-गेदी; अशी सहा नगरे व त्यांखालील खेडी.
६३. यरुशलेमेत राहणार्‍या यबूसी लोकांना घालवून देणे यहूदाच्या वंशजांना शक्य झाले नाही म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत यहूदाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.
१. योसेफाच्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा: त्याची सीमा यरीहोजवळ यार्देनेपासून सुरू होते व रानातून यरीहोच्या पूर्वेकडील पाणवठ्यावरून जाते आणि यरीहोपासून डोंगराळ प्रदेशातून बेथेलास जाते.
२. मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते;
३. पश्‍चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ-होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्रकिनार्‍यास मिळते.
४. येणेप्रमाणे योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांनी आपले वतन घेतले.
५. एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे ही ठरली: त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ-अद्दार येथून वरल्या बेथ-होरोनास जाते.
६. पुढे ती पश्‍चिमेकडे वळते व उत्तरेकडील मिखमथाथ येथून पूर्वेस वळते आणि तानथ-शिलो येथे जाते; तेथून पुढे ती पूर्वेकडे यानोहास जाते.
७. यानोहा येथून ती अटारोथ व नारा येथे उतरून यरीहोपाशी यार्देनेवर निघते.
८. ही सीमा तप्पूहा येथून निघून पश्‍चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्राजवळ निघते; एफ्राइमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन हे होय;
९. त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राइमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली.
१०. गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राइम्यांनी घालवून दिले नाही म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत; ते गुलाम होऊन वेठबिगार करणारे झाले.
१. मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र); प्रेमगीत. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.
२. मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे.
३. हे वीरा, तू आपली तलवार कंबरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर.
४. सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील.
५. तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात.
४. बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते.
५. विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो.
२९. तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असताना तो असे म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.
३०. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल.
३१. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील; कारण शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
३२. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
३३. दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो.
३४. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते.
३५. म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा.
३६. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
३७. तो बोलत आहे इतक्यात एका परूश्याने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली; मग तो आत जाऊन भोजनास बसला.
३८. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परूश्याला आश्‍चर्य वाटले.
३९. परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.
४०. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय?
४१. तर जे आत आहे त्याचा२ दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.
४२. परंतु तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्यांकडे दुर्लक्ष करता; ह्या गोष्टी करायच्या होत्या, व त्या सोडायच्या नव्हत्या.
४३. तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारांत नमस्कार घेणे तुम्हांला आवडते.
४४. अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणार्‍या कबरांसारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात.”
४५. तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.”
४६. तो म्हणाला, “तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार! कारण वाहण्यास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही.
४७. तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले!
४८. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता.
४९. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन, आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जिवे मारतील व कित्येकांना छळतील;
५०. ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त,
५१. म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखर्‍याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच.
५२. तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात; तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.”
५३. तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परूशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले;
५४. आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरून दोषी ठरवावे म्हणून ते टपून राहिले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide