१. अमस्या राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमेची होती.
२. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खर्या अंत:करणाने केले नाही.
३. त्याच्या हाती राज्य कायम झाले तेव्हा ज्या त्याच्या सेवकांनी त्याचा बाप राजा ह्याला वधले होते त्यांना त्याने जिवे मारले;
४. पण त्याच्या मुलाबाळांना त्याने मारले नाही. “मुलांमुळे बापांना मारू नये व बापांमुळे मुलांना मारू नये, ज्याने पाप केले तोच आपल्या पापास्तव मरावा” अशी जी परमेश्वराची आज्ञा मोशेच्या नियमशास्त्रात लिहिली आहे तिच्याप्रमाणे त्याने केले.
५. अमस्याने अवघा यहूदा व बन्यामीन मिळवला व त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमून दिले; जे वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे होते त्यांची त्याने गणती केली तेव्हा युद्ध करण्याजोगे व भाला व ढाल धारण करण्याजोगे तीन लाख लोक भरले.
६. त्याप्रमाणेच त्याने शंभर किक्कार चांदी देऊन एक लाख इस्राएल योद्धे चाकरीस ठेवले.
७. पण देवाचा एक माणूस त्याच्याकडे येऊन म्हणाला, “हे राजा, इस्राएलाच्या सेनेने तुझ्याबरोबर जाऊ नये, कारण परमेश्वर इस्राएलाच्या म्हणजे सर्व एफ्राईम वंशजांच्या बरोबर नाही.
८. पण तू जाणारच तर मर्दुमकी कर; युद्ध करण्याची हिंमत बांध. देव तुला आपल्या शत्रूपुढे चीत करील; साहाय्य करण्याचे व चीत करण्याचे देवाला सामर्थ्य आहे.”
९. अमस्याने देवाच्या माणसाला विचारले, “मी शंभर किक्कार रुपे इस्राएलच्या सैन्यास देऊन चुकलो आहे त्याच्यासंबंधाने मी काय करू?” देवाच्या माणसाने उत्तर दिले, “तुला ह्याहूनही अधिक देण्याची परमेश्वरास ताकद आहे.”
१०. मग एफ्राइमाहून जे सैन्य त्याच्याकडे आले होते त्याने स्वस्थानी परत जावे म्हणून अमस्याने ते निराळे केले; तेव्हा यहूदावर त्यांचा राग फार भडकला व ते अत्यंत क्रोधायमान होऊन स्वस्थानी परत गेले.
११. अमस्याने हिंमत धरून आपल्या लोकांना युद्धास नेले; क्षारखोर्यात जाऊन सेईर वंशजांपैकी दहा हजार लोक त्याने वधले.
१२. यहूदी लोकांनी आणखी दहा हजार पाडाव केले व त्यांना पर्वतशिखरावर नेऊन त्यांचा कडेलोट केला; आणि त्यांचा चुराडा झाला;
१३. पण जे सैन्य लढाईस आपल्याबरोबर न नेता अमस्याने परत लावून दिले होते त्या सैन्याने शोमरोनापासून बेथ-होरोनापर्यंत यहूदाच्या नगरांवर हल्ला केला; त्यांनी त्यांतल्या तीन हजारांना ठार करून पुष्कळ लूट नेली.
१४. अदोम्यांचा संहार करून परत आल्यावर अमस्याने सेईर लोकांची दैवते आणून त्यांना आपले देव मानले आणि तो त्यांची उपासना करू लागला व त्यांच्यापुढे धूप जाळू लागला.
१५. तेव्हा अमस्यावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्याच्याकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “ज्या मूर्तींना आपल्या लोकांस तुझ्या हातातून सोडवता आले नाही त्यांच्या भजनी तू का लागलास?”
१६. तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”
१७. मग यहूदाचा राजा अमस्या ह्याने मसलत घेऊन इस्राएलाचा राजा योवाश१ बिन यहोआहाज बिन येहू ह्याच्याकडे निरोप पाठवला की, “चल, आपण एकमेकांसमोर उभे राहू.”
१८. इस्राएलाचा राजा योवाश ह्याने यहूदाचा राजा अमस्या ह्याला सांगून पाठवले की, “लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्या एका गंधसरूकडे मागणी केली की, ‘तुझी मुलगी माझ्या मुलास दे.’ लबानोनात असलेला एक वनपशू त्या वाटेने गेला, त्याने ते काटेझुडूप पायांखाली तुडवून टाकले.
१९. तू म्हणतोस, ‘मी अदोमाचा मोड केला,’ त्यामुळे तुझे हृदय उन्मत्त होऊन तू फुशारकी मारत आहेस; आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तू आपण होऊन अरिष्टास का आमंत्रण करत आहेस?”
२०. अमस्या काही केल्या ऐकेना; कारण ते अदोमाच्या दैवतांच्या नादी लागले होते म्हणून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या स्वाधीन करावे असा देवाचा संकेत झाला होता.
२१. तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश चढाई करून गेला; तो व यहूदाचा राजा अमस्या ह्यांचा यहूदा देशातील बेथ-शेमेश येथे सामना झाला.
२३. इस्राएलाचा राजा योवाश ह्याने यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश बिन यहोआहाज ह्याला बेथ-शेमेश येथे पकडून यरुशलेमेस नेले; आणि त्याने एफ्राइमी वेशीपासून कोपरावेशीपर्यंत यरुशलेमेचा चारशे हात कोट पाडून टाकला.
२४. सर्व सोने, रुपे व सर्व पात्रे जी त्याला देवाच्या मंदिरात ओबेद-अदोम ह्याच्याजवळ सापडली ती सगळी व राजमंदिरातील खजिना व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला.
२५. इस्राएलाचा राजा योवाश बिन यहोआहाज ह्याच्या मृत्यूनंतर यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश पंधरा वर्षे जगला.
२६. अमस्याची अथपासून इतिपर्यंत बाकीची कृत्ये यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केलेली आहेत, नाहीत काय?
२७. अमस्याने परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दिले तेव्हा यरुशलेमेत त्याच्याविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले.
२८. त्यांनी त्याला घोड्यावर घालून आणले आणि यहूदाच्या राजधानीत त्याच्या पूर्वजांमध्ये त्याला मूठमाती दिली.
१. उज्जीया१ सोळा वर्षांचा असताना सर्व यहूदी लोकांनी त्याला त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले.
२. अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जीयाने एलोथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले.
३. उज्जीया राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत बावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यखिल्या; ती यरुशलेमेची होती.
४. त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी.
५. देवाचे दृष्टान्त जाणणारा जखर्या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले.
६. त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली.
७. पलिष्टी, गुर-बालवासी अरब व मऊनी ह्यांच्याविरुद्ध देवाने त्याला साहाय्य केले.
८. अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला.
९. उज्जीयाने यरुशलेमेत कोपरावेशीजवळ, खोरेवेशीजवळ आणि कोट वळसा घेतो तेथे बुरूज बांधून त्यांना बळकटी आणली.
१०. त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.
११. उज्जीयाजवळ लढाऊ लोकांचे सैन्य असे; राजाच्या सेनानायकांपैकी एक हनन्या म्हणून होता; त्याच्या हाताखालचा यइएल लेखक व मासेया कारभारी हे गणती करीत, त्यानुसार ते सैन्य टोळीटोळीने लढाईस जात असे.
१२. पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूर वीर असत त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती.
१३. त्यांच्या अधिकाराखाली तीन लक्ष सात हजार पाचशे एवढी कवायत शिकलेली फौज होती; शत्रूच्या विरुद्ध राजाला कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत.
१४. ह्या सर्व सेनेसाठी उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्ये व गोफणगुंडे तयार केले.
१५. यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली; त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली; त्याला इतके विलक्षण साहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला.
१६. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
१७. अजर्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजकपण करीत असलेले ऐंशी वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले.
१८. त्यांनी उज्जीया राजाला प्रतिकार करून म्हटले, “हे उज्जीया, परमेश्वराप्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे; अहरोनाचे वंशज जे याजक, ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचेच हे काम आहे. तू पवित्रस्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस; अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
१९. तेव्हा उज्जीयाला क्रोध आला, धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते; आणि तो याजकांवर संतापला असता, त्यांच्यादेखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले.
२०. मुख्य याजक अजर्या व दुसरे सर्व याजक ह्यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालवून दिले; परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला.
२१. उज्जीया राजा आमरण कोडी राहिला; तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे; त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले, व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला.
२२. उज्जीयाची अथपासून इतिपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याने लिहिली आहेत.
२३. उज्जीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; तो कोडी होता म्हणून राजांच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मूठमाती दिली; त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला.
१. योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या.
२. परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला; मात्र परमेश्वराच्या मंदिरात त्याने प्रवेश केला नाही. प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले.
३. त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले.
४. त्याने यहूदाच्या पहाडी देशात शहरे वसवली आणि वनात गढ्या व बुरूज बांधले.
५. त्याने अम्मोनी लोकांच्या राजाशी लढून त्यांच्यावर वर्चस्व मिळवले त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू, दहा हजार कोर जव अशी खंडणी दिली. दुसर्या व तिसर्या वर्षीही अम्मोनी लोकांनी अशीच खंडणी दिली.
६. योथाम आपला देव परमेश्वर ह्याला स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला.
७. योथामाची अवशिष्ट कृत्ये, त्याच्या सर्व लढाया व त्याचे वर्तन हे सर्व इस्राएल व यहूदी ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे.
८. तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता व यरुशलेमेत त्याने सोळा वर्षे राज्य केले.
९. योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आहाज हा राजा झाला.
१. मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे कोरहपुत्रांचे स्तोत्र. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!
२. माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.
३. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे.
४. तुझ्या घरात राहणार्यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. (सेला)
५. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य!
६. शोकजनक१ खोर्यातून जाताना ते त्यांना झर्यांचे स्थानच वाटते; आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो.
७. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते.
४. चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत.
५. उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.
१. मग असे झाले की, अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहचला; तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले.
२. त्यांना तो म्हणाला, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही.”
३. तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
४. पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.”
५. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला;
६. आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.
७. ते सगळे सुमारे बारा पुरुष होते.
८. नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
९. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले, आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला.
१०. असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणार्या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभू येशूचे वचन ऐकले.
१२. ते असे की, रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत.
१३. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहूदी, दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, “ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हांला शपथ घालतो.”
१४. एक यहूदी मुख्य याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते.
१५. त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे; पण तुम्ही कोण आहात?”
१६. मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडेनागडे होऊन पळून गेले.
१७. मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला.
१८. विश्वास ठेवणार्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली.
१९. जादूटोणा करणार्यांपैकी बर्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली; आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार रुपये झाली.
२०. ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide