१. शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले; दावीद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले.
२. हेब्रोन येथे दाविदाला पुत्र झाले ते हे: इज्रेलीण अहीनवाम हिच्यापासून त्याला अम्नोन झाला; हा त्याचा ज्येष्ठ पुत्र;
३. कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला;
४. हग्गीथीपासून चौथा पुत्र अदोनीया झाला; अबीटलेपासून पाचवा पुत्र शफाट्या झाला;
५. आणि दाविदाची स्त्री एग्ला हिच्यापासून सहावा पुत्र इथ्राम झाला. हेब्रोन येथे दाविदाला जे पुत्र झाले ते हे. दाविदाबरोबर करायच्या कराराविषयी अबनेर वाटाघाट करतो
६. शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अबनेराचे पाठबळ होते.
७. शौलाची एक उपपत्नी होती; ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते. ईश-बोशेथाने अबनेरास विचारले, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास?”
८. ईश-बोशेथाचे हे शब्द ऐकून अबनेरास क्रोध आला व तो त्याला म्हणाला, “मी काय यहूदाच्या कुत्र्याचे डोके आहे? (मी काय यहूदाच्या पक्षाचा आहे?) आज तुझा बाप शौल ह्याचे घराणे आणि आप्तजन ह्यांच्यावर मी दया करीत असून तुला दाविदाच्या हाती लागू दिले नाही, आणि तू आज ह्या बायकोच्या संबंधाने मला दोष देत आहेस काय?
९. मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बैरशेब्यापर्यंत इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर स्थापीन अशी आणभाक परमेश्वराने केली आहे; त्यानुसार मी त्याच्याशी वर्तन केले नाही तर देव अबनेराचे त्या मानाने, किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”
१०.
११. त्याच्याने अबनेरास काहीएक जबाब देववला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता.
१२. अबनेराने आपल्या नावाने दाविदाकडे जासूद पाठवून सांगितले, “हा देश कोणाचा बरे?” आणखी असेही सांगितले की, “आपण माझ्याशी सलोखा करा; सर्व इस्राएलाचे मन आपल्याकडे वळवण्याच्या कामी मी आपल्याला मदतीचा हात देतो.”
१३. दाविदाने म्हटले, “बरे, मी तुझ्याशी सलोखा करतो; पण एक गोष्ट तुला केली पाहिजे; ती ही की तू मला भेटायला येशील तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिला घेऊन येणार नाहीस तर तुझी माझी भेट होणार नाही.”
१४. दाविदाने शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याच्याकडे जासूद पाठवून सांगितले की, “माझी स्त्री मीखल जी मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा देऊन घेतली तिला माझ्याकडे पाठवून दे.”
१५. ईश-बोशेथाने लोक पाठवून तिचा नवरा लईशाचा पुत्र पालटीयेल त्याच्यापासून तिला आणले.
१६. तिचा नवरा तिच्याबरोबर गेला; तो बहूरीमापर्यंत तिच्यामागून रडत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत जा;” मग तो माघारी गेला.
१७. मग अबनेराने इस्राएलांच्या वडील जनांशी बोलणे लावले की, “दाविदाने आपल्यावर राज्य करावे अशी तुमची गतकाळी इच्छा होती.
१८. तर आता ती पूर्ण करा; कारण परमेश्वराने दाविदाविषयी म्हटले आहे की, ‘माझा सेवक दावीद ह्याच्या द्वारे मी आपले लोक इस्राएल ह्यांना पलिष्ट्यांच्या व त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवीन.”’
१९. मग अबनेराने बन्यामिनी लोकांशीही कानगोष्ट केली; आणि इस्राएलास व बन्यामिनी लोकांच्या सर्व घराण्यास जे काही इष्ट वाटले ते दाविदाच्या कानावर घालण्यासाठी तो हेब्रोनास गेला.
२०. अबनेर वीस पुरुष बरोबर घेऊन हेब्रोनास दाविदाकडे आला, तेव्हा दाविदाने अबनेरास व त्याच्याबरोबरच्या लोकांना मेजवानी दिली.
२१. अबनेर दाविदाला म्हणाला, “मी आता जातो आणि सर्व इस्राएल लोकांना माझ्या स्वामीराजांजवळ जमा करतो, म्हणजे ते आपणाशी करार करतील; मग ज्यांच्यावर राज्य करावे अशी आपली इच्छा आहे त्या सर्वांवर आपण राज्य कराल.” दाविदाने अबनेराची रवानगी केली; व तो सुखरूप निघून गेला.
२२. इकडे दाविदाचे लोक यवाबाबरोबर लुटीच्या स्वारीवरून परत आले; त्यांनी मोठी लूट आणली; पण अबनेर दाविदाजवळ हेब्रोन येथे नव्हता; कारण त्याने त्याला निरोप दिला असून तो सुखरूप निघून गेला होता.
२३. यवाब व त्याच्याबरोबरचे सगळे सैन्य परत आले तेव्हा यवाबाला लोकांनी सांगितले, “नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता; त्याची त्याने रवानगी केली व तो सुखरूप निघून गेला आहे.”
२४. यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, “आपण हे काय केले? अबनेर आपणाजवळ आला होता. त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला.
२५. नेराचा पुत्र अबनेर ह्याला आपण ओळखत असालच. तो आपणांस फसवायला आणि आपली हालचाल व आपले एकंदर करणेसवरणे ह्यांचा भेद घेण्यासाठी आला होता.”
२६. यवाब दाविदापासून निघून गेल्यावर त्याला नकळत यवाबाने अबनेराकडे जासूद पाठवले; आणि त्यांनी त्याला सिरा नावाच्या विहिरीपासून परत आणले.
२७. अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.
२८. पुढे दाविदाच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो म्हणाला, “नेराचा पुत्र अबनेर ह्याच्या खुनासंबंधाने मी व माझे राज्य परमेश्वराच्या दृष्टीने सदा निर्दोषच असणार.
२९. तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येवो; आणि यवाबाच्या वंशात स्रावी, महारोगी, काठी टेकत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही.”
३०. यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी अबनेराचा वध केला; कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्याला गिबोनाच्या लढाईत मारले होते.
३१. मग दावीद यवाबाला व आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना म्हणाला, “आपली वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरापुढे शोक करत चाला.” दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला.
३२. त्याने हेब्रोन येथे अबनेराला मूठमाती दिली; अबनेराच्या कबरेजवळ राजा गळा काढून रडला; सर्व लोकही रडले.
३३. दाविदाने अबनेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले: “मूढाप्रमाणे अबनेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय?
३४. तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले.
३५. दिवस अजून थोडा उरला होता, तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्याला आग्रह करण्यासाठी आले; पण दावीद शपथ घेऊन म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”
३६. सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई.
३७. ह्यावरून सर्व लोकांच्या व सर्व इस्राएल लोकांच्या लक्षात आले की नेराचा पुत्र अबनेर ह्याचा वध राजाकडून झाला नाही.
३८. राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय?
३९. मी एवढा अभिषिक्त राजा आहे तरी आज निर्बल आहे व हे सरूवेचे पुत्र मला फार भारी आहेत; पण परमेश्वर दुष्कर्म करणार्यांचे त्यांच्या दुष्कर्मानुसार पारिपत्य करो.”
१. अबनेर हेब्रोन येथे मारला गेला हे शौलाच्या पुत्राने ऐकले तेव्हा त्याचे हात दुर्बल झाले व सर्व इस्राएल लोक घाबरे झाले.
२. शौलाच्या पुत्राजवळ दोन पुरुष सेनानायक होते; एकाचे नाव बाना व दुसर्याचे नाव रेखाब. हे बन्यामिनी वंशातला रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र. बैरोथ हे नगरही बन्यामिन्यांच्या प्रांतात मोडत आहे.
३. बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत.
४. शौलाचा पुत्र योनाथान ह्याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता; इज्रेल येथून शौल व योनाथान ह्यांच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो पाच वर्षांचा होता; त्या वेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली; ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला; त्याचे नाव मफीबोशेथ असे होते.
५. दुपारी उन्हाच्या वेळी ईश-बोशेथ आराम करीत असता रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र रेखाब व बाना हे त्याच्या घरात घुसले.
६. गहू आणण्याच्या मिषाने घरात शिरून त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग रेखाब व त्याचा भाऊ बाना हे निसटून गेले.
७. ते घरात शिरले तेव्हा तो आपल्या शय्यागृहात पलंगावर निजला होता; तेथे त्यांनी त्याच्यावर प्रहार करून त्याचा वध केला व त्याचे शिर कापून घेऊन ते रातोरात अराबाच्या वाटेने गेले.
८. त्यांनी ईश-बोशेथाचे शिर हेब्रोनात दाविदाकडे आणले; ते राजाला म्हणाले, “पाहा, आपला शत्रू व आपला प्राण घेऊ पाहणारा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याचे हे शिर आहे; आज परमेश्वराने माझ्या स्वामीराजांप्रीत्यर्थ शौल व त्याचा वंश ह्यांचा सूड उगवला आहे.”
९. दाविदाने बैरोथकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना ह्यांना उत्तर दिले की, “ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचवला त्याच्या जीविताची शपथ,
१०. आपण चांगले वर्तमान आणले आहे अशा समजुतीने एकाने मला शौलाच्या मरणाची बातमी दिली; तेव्हा मी सिकलाग येथे त्याला धरून वधले; बातमी आणल्याचे हे बक्षीस मी त्याला दिले.
११. तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात, त्याच्या पलंगावर वध केला आहे; त्याचा खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हांला ह्या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे; नाही काय?”
१२. दाविदाने आपल्या तरुण लोकांना आज्ञा केल्यावरून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे हातपाय तोडून त्यांना हेब्रोनाच्या तळ्याजवळ टांगले. पण ईश-बोशेथाचे शिर नेऊन त्यांनी हेब्रोनात अबनेराच्या कबरेत पुरले.
५. हे माझ्या जिवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा; कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे.
६. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.
७. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे;
८. अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)
९. मानवप्राणी केवळ वाफ आहेत; ते केवळ मिथ्या आहेत; तराजूत घातले असता ते हलके भरतील; ते सर्व वाफच आहेत.
११. एकदा देव बोलला आहे; मी दोनदा हे ऐकले आहे की, सामर्थ्य देवाचे आहे.
१२. शिवाय, हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे; कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.
१३. नीतिमत्तेची वाणी राजांना आनंद देणारी आहे, यथान्याय बोलणार्यावर ते प्रेम करतात.
१४. राजाचा संताप मृत्युदूतांसारखा आहे; सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करतो.
१५. राजाच्या मुखतेजात जीवन आहे; त्याची प्रसन्नता सरत्या पावसाच्या मेघासारखी आहे.
३१. शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.”
३२. परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.”
३३. ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?”
३४. येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.
३५. ‘अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’ असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.
३६. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्याने व कापणी करणार्यानेही एकत्र आनंद करावा.
३७. ‘एक पेरतो व एक कापतो,’ अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे.
३८. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसर्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात.”
३९. “मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणार्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
४०. म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला.
४१. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला.
४२. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचीत ख्रिस्त, जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.”
४३. मग त्या दोन दिवसांनंतर तो तेथून गालीलात निघून गेला.
४४. कारण येशूने स्वत: साक्ष दिली की, ‘संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही.’
४५. म्हणून तो गालीलात आल्यावर गालीलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते.
४६. नंतर तो गालीलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता.
४७. येशू यहूदीयातून गालीलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, “आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा.” कारण तो मरणाच्या पंथास लागला होता.
४८. त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही.”
४९. तो अंमलदार त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा.”
५०. येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला.
५१. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.”
५२. ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला.”
५३. ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.
५४. येशूने यहूदीयातून गालीलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide