२. “पूर्वीचे महिने मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते! त्या दिवसांत देव माझे रक्षण करीत असे.
३. त्याचा दीप माझ्या शिरावर प्रकाशत असे; व त्याच्या तेजाने मी अंधकारात चालत असे;
४. त्या काळी मी भर उमेदीत होतो; देवाचा सहवास मला माझ्या डेर्यात घडे;
५. सर्वसमर्थ त्या काळी माझ्यासन्निध असे; माझी मुलेबाळे माझ्या सभोवती असत;
६. दह्यालोण्यात माझी पावले भिजत; खडकातून तेलाचे प्रवाह माझ्यासाठी निघत.
७. मी नगराच्या वेशीनजीक जाऊन, चौकात माझे आसन मांडी,
८. तेव्हा तरुण मला पाहून लपत, वृद्ध उठून उभे राहत;
९. सरदार बोलायचे थांबत व तोंडावर हात ठेवत;
१०. अमीरउमराव स्तब्ध राहत; त्यांची जीभ त्यांच्या टाळूस चिकटून राही.
११. कोणाच्या कानी माझे वर्तमान गेले असता तो मला धन्य म्हणे; कोणाच्या दृष्टीस मी पडलो असता तो माझ्याविषयी ग्वाही देई;
१२. कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित ह्यांचा मी उद्धार करी.
१३. नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी.
१४. नीतिमत्ता माझे पांघरूण होई आणि ती मला आच्छादून टाकी; माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे.
१५. मी आंधळ्याला नेत्र होई; लंगड्याला पाय होई.
१६. मी लाचारांचा पिता असे; अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेई.
१७. मी दुष्टांचे दात पाडी, त्याच्या दातांतून शिकार सोडवी.
१८. तेव्हा मी म्हणे की, ‘माझ्या घरकुलातच राहून मला मरण येईल, व माझे दिवस वाळूच्या कणांप्रमाणे१ बहुगुणित होतील;
१९. माझे मूळ पाण्याजवळ पसरेल; माझ्या फांदीवर रात्रभर दहिवर राहील.
२०. माझे वैभव माझ्या ठायी जसेच्या तसेच टवटवीत राहील;’ माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील.’
२१. लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत, माझा निर्णय ऐकायला ते स्तब्ध राहत.
२२. माझे बोलणे संपल्यावर ते पुन्हा बोलत नसत; माझे भाषण त्यांना पर्जन्यवृष्टीसारखे होई.
२३. लोक माझ्या बोलण्याची पावसाप्रमाणे वाट पाहत; जसे काय अखेरच्या पावसासाठी तोंड पसरून ते अपेक्षा करीत.
२४. ते निराश झाले असता मी त्यांच्याकडे हास्यवदन करून पाही; त्यांना माझे मुखतेज उतरवता येत नसे.
२५. मी त्यांचा मार्गदर्शक होई व त्यांच्यामध्ये अग्रस्थानी बसे; सैन्यात जसा राजा, शोकग्रस्तांत जसा समाधान करणारा, तसा मी त्यांच्यामध्ये असे.”
१. “असे असूनही आता जे माझ्याहून अल्प वयाचे आहेत, ज्यांच्या वडिलांची लायकी माझ्या मेंढ्याबकर्या राखण्यास कुत्रे म्हणून ठेवण्याचीही मी समजत नसे, ते माझी टवाळी करतात;
२. ज्यांचे वीर्य नष्ट झाले आहे, त्यांच्या बाहुबलाचा मला काय उपयोग?
३. ते दुर्भिक्षाने व उपासमारीने दुबळे झाले आहेत; भयाण व वैराण प्रदेशात मिळेल ते चावून ते गुजारा करीत आहेत.
४. ते झाडीच्या आसपासची लोण खुडून घेतात; रतम झाडाच्या मुळांवर ते निर्वाह करीत आहेत.
५. लोकांमधून त्यांना घालवून देतात; जशी चोराच्या मागून तशी त्यांच्यामागून लोक ओरड करतात.
६. उदासवाण्या खोर्यात, जमिनीच्या विवरात व कपारीत त्यांना राहावे लागते.
७. झाडीमध्ये ते रेंरें करीत बसतात; खाजकुयलीच्या खाली ते पडून राहतात.
८. ते मूढांचे किंबहुना अधमांचे वंशज आहेत; त्यांना देशातून हाकून दिले आहे.
९. हे लोक माझ्या निंदेची गाणी गातात; माझे नाव ज्याच्या-त्याच्या तोंडी झाले आहे.
१०. ते मला अमंगळ मानतात, माझ्या वार्यालाही उभे राहत नाहीत, माझ्या तोंडावर थुंकायला चुकत नाहीत;
११. कारण देवाने माझ्या आयुष्याची दोरी ढिली करून मला दु:ख दिले आहे; म्हणून ते माझ्यासमोर आपल्या तोंडाचा लगाम झुगारून देतात.
१२. बाजारबुणगे माझ्यावर उजवीकडून गर्दी करतात, माझे पाय ढकलून देतात, ते माझ्या नाशाचे मोर्चे रचतात.
१३. ते माझ्या मार्गाची नासाडी करतात, ज्यांना कोणी साहाय्य नाही, तेदेखील माझ्या नाशास साहाय्य होतात.
१४. खिंडारातून शिरकाव करणार्याप्रमाणे ते चालून येतात. कोसळून पडलेल्या ढिगारांतून ते माझ्यावर लोटतात.
१५. माझ्यावर घोर प्रसंग ओढवले आहेत; माझी प्रतिष्ठा ते वायूप्रमाणे उडवून देत आहेत; माझे सौख्य अभ्राप्रमाणे विरले आहे.
१६. माझ्या जिवाचे आता पाणीपाणी झाले आहे; दु:खाच्या दिवसांनी मला पछाडले आहे.
१७. रात्रीच्या समयी माझी हाडे पिचून गळतात; मला कुरतडणार्या वेदना थांबत नाहीत.
१८. व्याधीच्या मोठ्या वेगामुळे माझा झगा विस्कळीत झाला आहे; सदर्याच्या गळ्याप्रमाणे तो अंगाला जखडून बसतो.
१९. त्याने मला चिखलात लोटून दिले आहे; धूळ व राख ह्यांच्यासारखा मी झालो आहे.
२०. मी तुझा धावा करतो, पण तू ऐकत नाहीस; मी उभा राहतो; पण तू माझ्यावर डोळे वटारतोस.
२१. तू माझ्याशी निष्ठुर बनला आहेस; तू आपल्या बाहुबलाने माझा छळ करीत आहेस.
२२. तू मला वायूवर आरूढ करून उडवत आहेस. आणि गर्जणार्या तुफानात मला हेलकावत आहेस.
२३. मला ठाऊक आहे की तू मला मृत्युवश करशील; सर्व जीवधारी ज्या स्थळी एकत्र होणार आहेत त्याप्रत मला पोचवशील.
२४. तरी कोणी कोसळत असता आपला हात पुढे करीत नाही काय? आपला नाश होऊ लागला असता तो धावा करीत नाही काय?
२५. कठीण दिवस कंठणार्याला पाहून मी हळहळलो नाही काय? लाचारांसाठी मी कष्टी झालो नाही काय?
२६. मी सौख्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा विपत्ती आली; मी प्रकाशाची अपेक्षा करीत होतो तेव्हा अंधकार आला.
२७. माझे अंतर्याम एकसारखे पोळत१ आहे; दुःखाचे दिवस मला प्राप्त झाले आहेत.
२८. मी काळा होऊन फिरत आहे, तरी सूर्याच्या किरणांनी नव्हे; मी जनसमाजात उभा राहून करुणा भाकत आहे.
२९. मी कोल्ह्यांचा बंधू, शहामृगांचा सोबती झालो आहे.
३०. माझी त्वचा काळी होऊन गळून पडत आहे; माझी हाडे तापाने जळजळत आहेत.
३१. माझ्या वीणेतून शोकसूर, माझ्या पाव्यातून विलापरव निघत आहेत.”
७. जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो,२ त्याच्या चरणी लागा.
८. हे ऐकून सीयोन हर्षित झाली; हे परमेश्वरा, तुझ्या न्यायकृत्यांमुळे यहूदाच्या कन्यांनी उल्लास केला.
९. कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस. सर्व देवांहून तू परमथोर आहेस.
१०. अहो परमेश्वरावर प्रीती करणार्यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतो. तो त्यांना दुर्जनांच्या हातातून सोडवतो.
११. नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
१२. अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा; त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.
१५. माझ्या मुला, तुझे चित्त सुज्ञ असले तर माझ्या, माझ्याच चित्ताला आनंद होईल;
१६. तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझे अंतर्याम उल्लासेल.
१. करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणार्या सर्वांना,
२. देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:
३. देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
४. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो;
५. तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात;
६.
७. असे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.
८. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील.
९. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
१०. बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.
११. कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे.
१२. माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो.
१३. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?
१४. क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो.
१५. न जाणो, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणायचा!
१६. (आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.)
१७. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.
१८. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.
१९. “कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे.
२०. ‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?
२१. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,१ तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले.
२२. कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात,
२३. आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,
२४. परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.
२५. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.
२६. तर बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत;
२७. तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले;
२८. आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे,
२९. म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये.
३०. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;
३१. ह्यासाठी की, “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide