२. “मानवपुत्रा, सेईर डोंगराकडे आपले तोंड कर व त्याच्याविरुद्ध संदेश दे;
३. त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सेईर डोंगरा, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर चालवीन आणि तुला वैराण व उद्ध्वस्त करीन.
४. मी तुझी नगरे ओस करीन व तू उजाड होशील; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.
५. तू कायमचे वैर धरलेस आणि इस्राएल लोकांवर संकट आले तेव्हा, त्यांचा पापमूलक अंतसमय आला तेव्हा, त्यांना तलवारीच्या धारेच्या हवाली केलेस;
६. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुझ्या रक्तपाताची तयारी करीन व रक्तपात तुझा पिच्छा पुरवील; तू रक्तपाताविषयी नापसंती दाखवली नाहीस म्हणून रक्तपात तुझ्या पाठीस लागेल.
७. मी सेईर डोंगर उद्ध्वस्त व वैराण करीन; त्यात येणार्याजाणार्यांचा उच्छेद करीन.
८. त्याच्या वधलेल्या लोकांनी मी त्याचे डोंगर व्यापून टाकीन; तुझ्या टेकड्यांवर, तुझ्या खोर्यात व तुझ्या नाल्यांत तलवारीने वधलेले पडतील.
९. मी तुला कायमचे उद्ध्वस्त करीन, तुझी नगरे पुन्हा वसायची नाहीत; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
१०. ‘ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपण त्यांचा ताबा घेऊ,’ असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास,
११. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू जो द्वेष दाखवलास, तू त्यांचा द्वेष करून जो हेवा प्रकट केलास, त्यानुसार मी तुझ्याबरोबर वागेन; मी न्याय करून तुला शासन करीन, तेव्हा मी त्यांना प्रकट होईन.
१२. तू इस्राएलाच्या पर्वतांविरुद्ध म्हणालास की, ‘ते उद्ध्वस्त झाले आहेत, ते आम्हांला भक्षण करण्यासाठी दिले आहेत,’ हे तुझे सर्व दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे हे तुला कळेल.
१३. ह्या प्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने माझ्याविरुद्ध आपली थोरवी मिरवलीत, माझ्याविरुद्ध हवे तितके बोललात; ते मी ऐकले आहे.
१४. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, सर्व पृथ्वी आनंद करीत असता मी तुला उजाड करीन.
१५. इस्राएल घराण्याचे वतन उद्ध्वस्त झाले तेव्हा तुला हर्ष वाटला, म्हणून मी तुझेही तसेच करीन; हे सेईर डोंगरा, तू वैराण होशील, एकदम सारा अदोम ओसाड होईल; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
१. हे मानवपुत्रा, इस्राएलाच्या पर्वतांना संदेश देऊन सांग की, इस्राएलाच्या पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
२. प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्यासंबंधाने शत्रू म्हणतात, ‘अहा! ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत;’
३. म्हणून संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, त्यांनी तुम्हांला उद्ध्वस्त केले आहे, राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांचा तुमच्यावर ताबा बसावा म्हणून त्यांनी तुम्हांला चोहोकडून ग्रासले आहे, आणि तुमचे नाव लोकांच्या तोंडी झाले आहे व त्यांना तुम्ही निंदेचा विषय झाला आहात.
४. ह्यास्तव इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; आसपासच्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांना लूट व निंदेचा विषय झालेले पर्वत व टेकड्या, नाले व खोरी, उजाड व ओसाड नगरे ह्यांना प्रभू परमेश्वर असे म्हणतो की,
५. राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले व सगळा अदोम ह्यांनी उल्लासयुक्त मनाने व द्वेषबुद्धीने माझा देश लुटून फस्त करण्याच्या हेतूने तो आपल्या सत्तेत घेतला; ह्यास्तव मी त्यांच्याविरुद्ध ईर्ष्यायुक्त होऊन निश्चितपणे बोललो आहे.
६. इस्राएल देशाविषयी संदेश देऊन पर्वत व टेकड्या, नाले व खोरी ह्यांना सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, परराष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुम्ही साहिली आहे म्हणून, पाहा, मी आपल्या ईर्ष्येने व संतापाने बोललो आहे.
७. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात उचलला आहे; तुझ्याभोवतालची परकी राष्ट्रे खचीत अप्रतिष्ठा पावतील;
८. पण इस्राएलाचे पर्वतहो, तुमच्यावरील वृक्षांना फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांना फळे द्याल असे लवकरच घडून येईल.
९. कारण पाहा, मी तुम्हांला अनुकूल आहे, मी तुमच्याकडे वळेन व तुमच्यावर नांगरणी-पेरणी होईल.
१०. मी तुमच्यावर माणसांची, इस्राएलाच्या एकंदर सर्व घराण्याची संख्या वाढवीन; नगरे वसतील; पडीत स्थळे बांधून काढतील.
११. मनुष्य व पशू ह्यांची संख्या मी तुमच्यावर वाढवीन, ते वृद्धी पावून फलद्रूप होतील; पूर्वीच्या काळाप्रमाणे तुमच्यावर वस्ती होईल, आणि सुरुवातीला केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
१२. माणसे म्हणजे माझे इस्राएल लोक, तुमच्यावर पुन्हा येजा करतील असे मी करीन; ते तुमचा१ ताबा घेतील, तुम्ही त्यांचे वतन व्हाल, तुम्ही२ इतःपर त्यांना अपत्यहीन करणार नाही.
१३. प्रभू परमेश्वर म्हणतो: ते तुम्हांला म्हणत की, ‘तू मनुष्यभक्षक देश आहेस, तू आपल्या राष्ट्रांस अपत्यहीन केले आहेस;’
१४. तर तू ह्यापुढे माणसे भक्षणार नाहीस, आपल्या राष्ट्रापुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
१५. इत:पर मी तुला राष्ट्रांची निंदा ऐकवणार नाही, राष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुला सोसावी लागणार नाही, तू आपल्या राष्ट्रांपुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
१६. परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले की,
१७. “मानवपुत्रा, इस्राएल घराणे देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या आचाराने व कृतींनी तो देश भ्रष्ट केला; त्यांचा आचार माझ्यासमक्ष ऋतुमती स्त्रीच्या विटाळाप्रमाणे होता.
१८. त्यांनी देशात रक्तपात केला व आपल्या मूर्तींनी तो भ्रष्ट केला म्हणून मी देशावर आपल्या संतापाचा वर्षाव केला.
१९. मी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग केली, देशोदेशी त्यांची दाणादाण झाली; त्यांच्या आचाराप्रमाणे व कृतींप्रमाणे मी त्यांचा न्याय केला.
२०. ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला; लोक त्यांच्याविषयी म्हणत की, ‘हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.’
२१. परंतु इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत गेले तेथे तेथे त्याने माझ्या पवित्र नामास बट्टा लावला, तेव्हा मी आपल्या नामास जपलो.
२२. ह्याकरता इस्राएल घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, मी हे तुमच्याकरता करत नाही, तर तुम्ही राष्ट्राराष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून माझ्या नामाप्रीत्यर्थ मी हे करत आहे.
२३. तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले, ते ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांदेखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील तेव्हा राष्ट्रांना समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
२४. कारण मी तुम्हांला राष्ट्रांतून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांला जमा करून तुमच्या देशात आणीन.
२५. मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.
२६. मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन.
२७. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन.
२८. मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल, आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल.
२९. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हांला मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही.
३०. वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही.
३१. तुम्हांला आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल; तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये ह्यांमुळे तुमचा तुम्हांलाच वीट वाटेल.
३२. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मी तुमच्याकरता करीत नाही हे तुम्हांला ठाऊक असू द्या; हे इस्राएल घराण्या, तुम्ही आपल्या आचाराविषयी लज्जित व फजीत व्हा.
३३. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हांला स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन.
३४. आल्यागेल्यास वैराण दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल.
३५. तेव्हा लोक म्हणतील, ‘ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यांत वस्ती झाली आहे.’
३६. जी राष्ट्रे तुमच्यासभोवती निभावून राहतील त्यांना समजेल की मी परमेश्वर उद्ध्वस्त झालेली स्थाने बांधून काढतो. उजाड झालेल्याची लागवड करतो. मी परमेश्वर जे बोललो आहे ते करीनच.
३७. प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्राएल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल; कळपाप्रमाणे मी त्यात माणसांची वृद्धी करीन.
३८. पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरुशलेमेतील सणाचा कळप ह्यांप्रमाणे ओसाड नगरे मनुष्याच्या कळपांनी भरून जातील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
१. दाविदाचे आरोहणस्तोत्र. हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाही.
२. खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे.
३. हे इस्राएला, आतापासून सर्वकाळ तू परमेश्वराची आशा धर.
२. नीतिमान बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवतो तेव्हा प्रजा हायहाय करते.
३. ज्या मनुष्याला ज्ञानाची आवड असते तो आपल्या बापाला आनंदित करतो, पण वेश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची धूळधाण करतो.
१. माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे.
२. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.
३. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो.
४. तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वार्याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात.
५. तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते!
६. जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे.
७. श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे;
८. परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे.
९. तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो.
१०. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.
११. झर्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?
१२. माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खार्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
१३. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत.
१४. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका.
१५. हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे.
१६. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.
१७. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.
१८. पण शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide