बायबल एकाच वर्षात

१. इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, याशूब व शिम्रोन असे चार.
२. तोलाचे पुत्र: उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल; हे आपला बाप तोला ह्याच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या पिढीतले शूर वीर पुरुष होते; त्यांची संख्या दाविदाच्या काळात बावीस हजार सहाशे होती.
३. उज्जीचा पुत्र इज्रह्या; इज्रह्याचे पुत्र मीखाएल, ओबद्या, योएल व इश्शीया असे पाच होते; हे सर्व प्रमुख पुरुष होते.
४. त्यांच्या कुळांप्रमाणे व पितृकुळांप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्यांचे छत्तीस हजार पुरुष असत; कारण त्यांना बायका व मुले पुष्कळ होती.
५. इस्साखाराच्या सर्व कुळांतले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते; वंशावळीत ते एकंदर सत्त्याऐंशी हजार नमूद झाले होते. बन्यामिनाचे वंशज
६. बन्यामिनाचे पुत्र: बेला व बेकेर व यदीएल असे तिघे.
७. बेलाचे पुत्र: एस्बोन, उज्जी, उज्जीएल, यरीमोथ व ईरी असे पाच; हे आपल्या पितृकुळाचे प्रमुख असून शूर वीर होते; वंशावळीत ते बावीस हजार चौतीस नमूद झाले होते.
८. बेकेराचे पुत्र: जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ. हे सर्व बेकेराचे पुत्र.
९. ते आपापल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते. वंशावळीत ते वीस हजार दोनशे नमूद झाले होते.
१०. यदीएलाचा पुत्र बिल्हान; बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
११. हे सर्व यदीएलाचे वंशज; ते आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते; सेनेबरोबर जाण्यास लायक असे ते सतरा हजार दोनशे होते.
१२. ईराचे वंशज: शुप्पीम व हुप्पीम; आणि अहेराचे वंशज हुशीम.
१३. नफतालीचे पुत्र यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम, ही बिल्हेची संतती.
१४. मनश्शेचे पुत्र: त्याच्या बायकोपासून त्याला अस्रीएल झाला; त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलादाचा बाप माखीर हा झाला.
१५. माखीराने हुप्पीम व शुप्पीम ह्यांची बहीण बायको केली; तिचे नाव माका; दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद; सलाफहादाला मुलीच होत्या.
१६. माखीराची बायको माका हिला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले व त्याच्या भावाचे नाव शेरेश होते. त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.
१७. ऊलामाचा पुत्र बदान. गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याचे पुत्र हे:
१८. त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर व महला ही झाली.
१९. शमीदाचे पुत्र: अह्यान, शेखेम, लिखी व अनीयाम.
२०. एफ्राइमाचे पुत्र: त्याचा पुत्र शुथेलाह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलादा; त्याचा पुत्र तहथ,
२१. त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलाह आणि एजेर व एलद; ह्यांना गथच्या मूळच्या रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरेढोरे हरण करण्यासाठी ते गेले होते.
२२. ह्यामुळे त्यांचा बाप एफ्राईम ह्याने बहुत दिवस शोक केला, आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यासाठी आले.
२३. तो आपल्या बायकोपाशी गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला; त्याने त्याचे नाव बरीया (भाग्यहीन) असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.
२४. त्याची कन्या शेरा; तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेरा ही वसवली.
२५. त्याचे पुत्र रेफह व रेशेफ; रेशेफाचा पुत्र तेलह, त्याचा पुत्र तहन,
२६. त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, त्याचा पुत्र अलीशामा,
२७. त्याचा पुत्र नून व त्याचा पुत्र यहोशवा.
२८. त्यांची वतने व वसतिस्थाने ही होत: बेथेल व त्याच्यालगतची खेडी. पूर्वेस नारान, पश्‍चिमेस गेजेर व त्याची खेडी, शखेम व त्याची खेडी, गज्जा व त्याची खेडी येथपर्यंत;
२९. त्याप्रमाणेच मनश्शेच्या वंशजांच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, मगिद्दो व त्याची खेडी, दोर व त्याची खेडी. ह्यांत इस्राएलाचा पुत्र योसेफ ह्याचे वंशज राहत होते.
३०. आशेराजे पुत्र: इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया व त्यांची बहीण सेराह.
३१. बरीयाचे पुत्र: हेबेर व मालकीएल, हा बिर्जाविथाचा बाप.
३२. हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा ही झाली.
३३. यफलेटाचे पुत्र: पासख, बिम्हाल व अश्वाथ; ही यफलेटाची संतती.
३४. शेमेराचे पुत्र: अही, राहागा, यहूबा व अराम.
३५. त्याचा भाऊ हेलेम ह्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश व आमाल.
३६. सोफहाचे पुत्र: सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी, इम्रा,
३७. बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान व बैरा.
३८. येथेराचे पुत्र: यफुन्ने, पिस्पा व अरा.
३९. उल्लाचे पुत्र: आरह, हन्निएल व रिस्या.
४०. हे सर्व आशेराचे वंशज होते; हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून निवडक महावीरांचे व सरदारांचे अग्रणी होते; आणि लढाईच्या कामगिरीसाठी त्यांची टीप घेतली तेव्हा ते सव्वीस हजार भरले.
१. बन्यामिनाला ज्येष्ठ पुत्र बेला, दुसरा आश्बेल, तिसरा अहरह,
२. चौथा नोहाह व पाचवा राफा हे झाले.
३. बेलाचे पुत्र: अद्दार, गेरा, अबीहूद,
४. अबीशूवा, नामान, अहोह,
५. गेरा, शफूफान व हूराम.
६. एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते; त्यांना पाडाव करून मानाहथ येथे नेले;
७. नामान, अहीया व गेरा ह्यांना त्याने कैद करून नेले; त्याला उज्जा व अहीहूद हे झाले.
८. त्यांना घालवून दिल्यावर मवाबाच्या पठारात शहरयिमास संतती झाली; त्याच्या बायका हुशीम व बारा ह्या होत्या.
९. त्याची बायको होदेश; हिच्या पोटी त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,
१०. यऊस, शख्या व मिर्मा हे झाले. हे त्याचे पुत्र त्यांच्या पितृकुळांतले प्रमुख होत.
११. हुशीमेपासून त्याला अबीटूब व एल्पाल झाले.
१२. एल्पालाचे पुत्र: एबर, मिशाम व शमेद; शमेदाने ओनो व लोद आणि त्यांची खेडीपाडी वसवली.
१३. बरीया व शमा हे अयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरांना पळवून लावले;
१४. अह्यो, शाशक, यरेमोथ,
१५. जबद्या, अराद, एदर,
१६. मीखाएल, इश्पा व योहा, हे बरीयाचे पुत्र;
१७. जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर;
१८. इश्मरय, इज्लीया व योबाब हे एल्पालाचे पुत्र;
१९. याकीम, जिख्री, जब्दी,
२०. एलीएनय, सिलथय, अलीएल,
२१. अदाया, बराया व शिम्राथ हे शिमीचे पुत्र;
२२. इश्पान, एबर, अलीएल;
२३. अब्दोन, जिख्री, हानान,
२४. हनन्या, एलाम, अनथोथीया,
२५. इफदया व पनुएल हे शाशकाचे पुत्र;
२६. शम्शरय, शहर्‍या, अथल्या,
२७. यारेश्या, एलीया व जिख्री हे यरोहामाचे पुत्र;
२८. हे आपापल्या पिढीत आपापल्या पितृकुळांतले प्रमुख पुरुष असून यरुशलेम येथे राहत असत.
२९. गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका;
३०. त्याचे पुत्र: ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नादाब,
३१. गदोर, अह्यो व जेखर,
३२. आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते.
३३. नेराला कीश झाला; कीशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश्बाल हे होते.
३४. योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बाल ह्याला मीखा झाला.
३५. मीखाचे पुत्र: पीथोन, मेलेख, तरेया व आहाज.
३६. आहाजास यहोअद्दा झाला; यहोआद्दास आलेमेथ, अजवामेथ व जिम्री हे झाले; जिम्रीस मोसा झाला.
३७. मोसाला बिना झाला; त्याचा पुत्र राफा, त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल;
३८. आसेलास सहा पुत्र होते, त्यांची नावे ही: अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हान; हे सर्व आसेलाचे पुत्र.
३९. त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत.
४०. ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते.
४. तू माझ्या पापणीस पापणी लागू देत नाहीस; मी विव्हळ झालो आहे, मला बोलवत नाही.
५. पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली आहेत.
६. रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करतो; माझा जीव विचारात पडला आहे की,
७. “प्रभू सर्वकाळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय?
८. त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय?
९. देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?” (सेला)
१३. मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे; बायकोच्या कटकटी सतत गळणार्‍या ठिपक्यांप्रमाणे आहेत.
१४. घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते.
२२. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत; म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले की,
२३. “बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि बाहेर दरवाजांपुढे पहारेकरी उभे राहिलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही.”
२४. हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले.
२५. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.”
२६. तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते.
२७. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले,
२८. “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.”
२९. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.
३०. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले.
३१. त्याने इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
३२. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणार्‍यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.”
३३. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.
३४. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले.
३५. मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा.
३६. कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली; तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले.
३७. त्याच्यामागून गालीलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसांत पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले; त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली.
३८. म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल;
३९. परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही; तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”
४०. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले; त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि ‘येशूच्या नावाने बोलू नका’ अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले.
४१. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले.
४२. आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide