१. ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांची त्यांच्या-त्यांच्या वंशांप्रमाणे गणती झाली; त्यांच्या वंशावळ्या इस्राएलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत; यहूदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशात नेले.
२. जे प्रथम आपल्या वतनाच्या नगरात राहण्यास आले ते इस्राएल, याजक, लेवी व नथीनीम हे होते.
३. यहूदी, बन्यामिनी, एफ्राइमी व मनश्शे ह्यांच्यापैकी जे यरुशलेमेत राहण्यास आले ते हे:
४. ऊथय बिन अम्मीहूद बिन अम्री बिन इम्री बिन बानी; हा बानी, पेरेस बिन यहूदा ह्याच्या वंशातला होता.
५. शिलोन्यांपैकी ज्येष्ठ पुत्र असाया व त्याचे पुत्र.
६. जेरहाच्या पुत्रांतला यऊवेल व त्याचे सहाशे नव्वद भाऊबंद.
१५. आणि बक्बकार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्या बिन मीखा, बिन जिख्री, बिन आसाफ;
१६. आणि ओबद्या बिन शमाया, बिन गालाल, बिन यदूथून; आणि बरेख्या बिन आसा, बिन एलकाना; हा नटोफाथी ह्यांच्या वस्तीत राहत असे.
१७. द्वारपाळांपैकी हे: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान, व त्यांचे भाऊबंद; शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता;
१८. हे ह्या काळपर्यंत पूर्वेस राजाच्या देवडीवर देवडीवाल्यांचे काम करीत असत; लेव्यांच्या छावणीचे द्वारपाळ हेच होते.
१९. आणि शल्लूम बिन कोरे, बिन एब्यासाफ, बिन कोरह, आणि त्यांच्या पितृकुळातील त्यांचे भाऊबंद जे कोरही त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक असून ते दर्शनमंडपाचे द्वारपाळ असत; त्यांचे वाडवडील परमेश्वराच्या छावणीवरील कामदार असून द्वारपाळ असत.
२०. पूर्वीच्या काळी फिनहास बिन एलाजार हा त्यांचा सरदार असे; परमेश्वर त्यांच्याबरोबर असे.
२१. जखर्या बिन मशेलेम्या हा दर्शनमंडपाचा द्वारपाळ होता.
२२. सर्व द्वारपाळांच्या कामासाठी दोनशे बारा लोक निवडले होते. त्यांना दावीद व शमुवेल द्रष्टा ह्यांनी ह्या कामगिरीवर नेमले होते. त्यांच्या-त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांना नमूद केले होते.
२३. ते व त्यांचे वंशज परमेश्वराच्या मंदिराच्या म्हणजे दर्शनमंडपाच्या द्वारपाळाचे काम पाळीपाळीने पाहत असत.
२४. द्वारपाळ पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना असत.
२५. त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यांत राहत असत ते सात-सात दिवसांनी पाळीपाळीने त्यांच्याकडे येत;
२६. चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते.
२७. देवाच्या मंदिराचे रक्षण त्यांच्याकडे सोपवले असल्यामुळे ते त्याच्या आसपास रात्रीचे राहत, आणि दररोज सकाळी मंदिर उघडण्याचे काम त्यांचे होते.
२८. उपासनेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काही जणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते एकेक मोजून आत ठेवत व एकेक मोजून बाहेर काढत.
२९. त्यांच्यापैकी काही जणांकडे सामान-सुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये ह्यांची व्यवस्था असे.
३०. याजकपुत्रांपैकी काही जण गांध्यांचे काम करीत.
३१. तव्यावर ज्या वस्तू भाजण्यात येत त्यांवर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी मत्तिथ्या ह्याला नेमले होते, हा शल्लूम कोरहीचा ज्येष्ठ पुत्र.
३२. कहाथी कुळातील त्यांच्या कित्येक भाऊबंदांची नेमणूक समर्पित भाकरीसंबंधीच्या कामावर झाली होती; ते प्रत्येक शब्बाथ दिवशी त्या तयार करीत.
३३. वर सांगितलेले गायक लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख होते; ते कोठड्यांत राहत; त्यांना इतर काही काम नसे; ते रात्रंदिवस आपल्या कामात गुंतलेले असत.
३४. हे त्यांच्या-त्यांच्या पिढ्यांतले, लेव्यांच्या पितृ-कुळातले प्रमुख पुरुष होत; ते यरुशलेमेत राहत.
३५. गिबोनात गिबोनाचा बाप यहीएल राहत होता, ह्याच्या बायकोचे नाव माका;
३६. आणि त्यांचे पुत्र: ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नेर, नादाब,
३७. गदोर, अह्यो, जखर्या व मिकलोथ.
३८. मिकलोथाला शिमाम झाला; हेही यरुशलेमेत आपल्या भाऊबंदांजवळ त्यांच्यासमोर राहत असत.
३९. नेरास कीश झाला, कीशास शौल झाला, शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल हे झाले.
४०. योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बालास मीखा झाला.
४१. मीखाचे पुत्र पीथोन, मेलेख व तहरेया.
४२. आहाजास यारा झाला, यारास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री हे झाले, जिम्रीस मोसा झाला.
४३. मोसास बिना झाला, त्याचा पुत्र रफाया, त्याचा पुत्र एलासा, त्याचा पुत्र आसेल;
४४. आणि आसेलास सहा पुत्र झाले, त्यांची नावे ही: अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या व हानान, हे आसेलाचे पुत्र.
१. पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.
२. पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा निकराने पाठलाग करून शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब व मलकीशुवा ह्यांचा वध केला.
३. शौलाशीही लढाई फार निकराची झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले व त्याच्यामुळे तो फार हैराण झाला.
४. तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक; तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना, तो फार घाबरला होता; तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.
५. शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्याबरोबर मेला.
६. ह्याप्रमाणे शौल व त्याचे तिघे पुत्र व त्याच्या घरची माणसे मृत्यू पावली.
७. खोर्यात असलेल्या सर्व इस्राएल लोकांनी पाहिले की लढवय्ये पळाले आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.
८. दुसर्या दिवशी पलिष्टी लोक वधलेल्यांना लुटायला आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले.
९. तेव्हा त्यांनी शौलास नागवून त्याचे शिर व चिलखत काढून घेतले आणि ते आपल्या देशात सर्वत्र पाठवून आपल्या मूर्तींना व लोकांना हे वर्तमान कळवले.
१०. त्यांनी त्याची हत्यारे आपल्या देवळात ठेवली व त्याचे शिर दागोनाच्या देवळात टांगले.
११. पलिष्ट्यांनी शौलाचे जे काही केले ते सगळे याबेश गिलादाच्या सर्व रहिवाशांनी ऐकले,
१२. तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले आणि त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते याबेश येथे आणली व त्यांच्या अस्थी घेऊन याबेशातील एका वृक्षाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.
१३. शौलाने परमेश्वराचा अपराध केला, परमेश्वराचा शब्द मानला नाही आणि परमेश्वराला प्रश्न करण्याऐवजी भूतविद्याप्रवीण स्त्रीचा त्याने सल्ला घेतला,
१४. ह्या सर्वांमुळे तो मेला; परमेश्वराने त्याला मारले आणि इशायाचा पुत्र दावीद ह्याला राज्य बहाल केले.
१०. “परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”१ असे वाटून मला दु:ख झाले.
११. मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन.
१२. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.
१३. हे देवा, तुझा मार्ग पवित्र२ आहे; देवासारखा थोर देव कोण आहे?
१४. अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस.
१५. याकोब व योसेफ ह्यांची संतती म्हणजे तुझे लोक, ह्यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस. (सेला)
१६. जो आज्ञा पाळतो तो आपले प्राण रक्षतो; जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल.
१. त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.
२. तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही.
३. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू;
४. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
५. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.
६. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
७. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
८. स्तेफन कृपा१ व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे.
९. तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर, आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यांतील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले.
१०. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
११. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले” असे म्हणण्यास पढवले.
१२. आणि लोकांना, वडिलांना व शास्त्र्यांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यासभेपुढे नेले;
१३. आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्रस्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही;
१४. कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.”
१५. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide