बायबल एकाच वर्षात

१. ह्यानंतर पारसाचा राजा अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत एज्रा बिन सराया बिन अजर्‍या बिन हिल्कीया
२. बिन शल्लूम बिन सादोक बिन अहीटूब
३. बिन अमर्‍या बिन अजर्‍या बिन मरोयाथ
४. बिन जरह्या बिन उज्जी बिन बुक्की
५. बिन अबीशूवा बिन फिनहास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता.
६. हाच एज्रा बाबेलहून गेला; हा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता; त्याचा देव परमेश्वर ह्याचा वरदहस्त त्याच्यावर होता, म्हणून राजाने त्याचा सर्व मनोरथ पूर्ण केला.
७. इस्राएल लोक, याजक, लेवी, गायक, द्वारपाळ व नथीनीम ह्यांतले काही जण मिळून अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी यरुशलेमेस गेले.
८. राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात एज्रा यरुशलेमेस जाऊन पोहचला.
९. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलहून निघाला; देवाचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळे तो पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस यरुशलेमेस पोचला.
१०. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे अध्ययन करून त्याप्रमाणे चालण्याचा आणि इस्राएलास त्यातले नियम व निर्णय शिकवण्याचा एज्राने निश्‍चय केला होता.
११. एज्रा याजक शास्त्री असून परमेश्वराची आज्ञावचने व त्याने इस्राएलास विहित केलेले नियम ह्यांत पारंगत होता; त्याला अर्तहशश्त राजाने जे पत्र दिले त्याची नक्कल ही:
१२. “स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री एज्रा याजक ह्याला राजाधिराज अर्तहशश्त इत्यादी;
१३. मी असे फर्मावतो की माझ्या राज्यातील जे इस्राएल लोक व त्यांचे जे याजक व लेवी आपखुशीने यरुशलेमेत जाऊ इच्छित असतील त्यांना तुझ्याबरोबर जाण्याची परवानगी आहे;
१४. तुझ्याजवळ देवाचे जे नियमशास्त्र आहे त्यानुसार यहूदा व यरुशलेम ह्यांची स्थिती आहे किंवा कसे ह्याचा तपास करावा म्हणून राजा व त्याचे सात मंत्री ह्यांच्याकडून तुला रवाना करण्यात येत आहे;
१५. आणि यरुशलेमनिवासी जो इस्राएलाचा देव त्याला राजाने व त्याच्या मंत्र्यांनी स्वसंतोषाने अर्पण केलेले सोने व रुपे तू न्यावेस;
१६. तसेच जेवढे सोने व रुपे सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल आणि लोक व याजक यरुशलेमेतील आपल्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ जे स्वसंतोषाचे अर्पण देतील ते सर्व तू न्यावेस.
१७. तू त्या पैशांचे बैल, मेंढे, कोकरे, व त्यांबरोबरची अन्नार्पणे व पेयार्पणे ही हयगय न करता खरेदी करून यरुशलेमेतील तुमच्या देवाच्या मंदिरात असलेल्या वेदीवर अर्पण करावीत.
१८. जे सोने व रुपे शिल्लक राहील त्याचा विनियोग तुला व तुझ्या भाऊबंदांना योग्य वाटेल तसा आपल्या देवाच्या इच्छेप्रमाणे करावा.
१९. तुझ्या देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी जी पात्रे तुला देण्यात येत आहेत ती यरुशलेमेच्या देवासमोर सादर कर.
२०. ह्याहून आणखी देवाच्या मंदिरास लागणारे जे तुला द्यावे लागेल ते राजभांडारातून घ्यावे.
२१. मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व भांडार्‍यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे;
२२. रुपे शंभर किक्कारपर्यंत,१ गहू शंभर कोरपर्यंत,२ द्राक्षारस शंभर बथपर्यंत,२ तेल शंभर बथपर्यंत व लागेल तेवढे मीठ देण्यात यावे.
२३. जी काही आज्ञा स्वर्गीचा देव करील तिच्यानुसार स्वर्गीच्या देवाच्या मंदिरासाठी करण्यात यावे; राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या राज्यावर त्याचा रोष होईल असे का होऊ द्यावे?
२४. तसेच आम्ही असे फर्मावतो की, देवाच्या ह्या मंदिरातील जे कोणी याजक, लेवी, गायक, द्वारपाळ, नथीनीम व इतर सेवक असतील त्यांच्यापासून खंडणी, कर अथवा जकात घ्यायची नाही.
२५. हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश ह्यांची नेमणूक कर; तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणार्‍या अशा त्या महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्यायनिवाडा करावा आणि त्यासंबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे.
२६. जे कोणी तुझ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यांना ताबडतोब शासन करावे; प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद ह्यांतील कोणतीही शिक्षा त्यांना करावी.”
२७. यरुशलेमेतील देवाचे मंदिर शोभिवंत करावे अशी इच्छा राजाच्या मनात ज्याने उत्पन्न केली आहे तो आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर धन्य!
२८. राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.
१. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीत माझ्याबरोबर बाबेलहून आले त्यांच्या पितृकुळांचे प्रमुख व त्यांची वंशावळी येणेप्रमाणे:
२. फिनहासाच्या वंशातला गेर्षोम, इथामाराच्या वंशातला दानीएल व दाविदाच्या वंशातला हट्टूश.
३. शखन्याच्या वंशातला परोशाच्या कुळातला जखर्‍या व त्याच्याबरोबर एकशे पन्नास पुरुषांची गणती वंशावळीप्रमाणे झाली.
४. पहथ-मवाबाच्या वंशातला एल्यहोवेनय बिन जरह्या व त्याच्याबरोबर दोनशे पुरुष.
५. शखन्याच्या वंशांतला यहजीएलाचा पुत्र व त्याच्या-बरोबर तीनशे पुरुष.
६. आदीनाच्या वंशातला एबद बिन योनाथान व त्याच्याबरोबर पन्नास पुरुष.
७. एलामाच्या वंशातला यशाया बिन अथल्या व त्याच्याबरोबर सत्तर पुरुष.
८. शफाट्याच्या वंशातला जबद्या बिन मीखाएल व त्याच्याबरोबर ऐंशी पुरुष.
९. यवाबाच्या वंशातला ओबद्या बिन यहीएल व त्याच्याबरोबर दोनशे अठरा पुरुष.
१०. शलोमिथाच्या वंशातला योसिफ्याचा पुत्र व त्याच्याबरोबर एकशे साठ पुरुष
११. बेबाईच्या वंशातला जखर्‍या बिन बेबाई व त्याच्या-बरोबर अठ्ठावीस पुरुष.
१२. अजगादाच्या वंशातला योहानान बिन हक्काटान व त्याच्याबरोबर एकशे दहा पुरुष.
१३. अदोनीकामाच्या वंशातले जे शेवटचे त्यांची नावे ही: अलीफलेट, यइएल व शमाया आणि त्यांच्याबरोबर साठ पुरुष.
१४. बिग्वईच्या वंशांतले ऊथय व जब्बूद व त्यांच्याबरोबर सत्तर पुरुष.
१५. अहवा नदीला जी नदी मिळते तिच्याजवळ मी त्यांना जमवले; तेथे आम्ही डेरे देऊन तीन दिवस राहिलो; आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाहीत.
१६. मग मी निरोप पाठवून अलियेजर, अरीएल, शमाया, एलनाथान, यारीब, एलनाथान, नाथान, जखर्‍या व मशुल्लाम ह्या प्रमुखांना आणि योयारीब व एलनाथान ह्या सुज्ञ पुरुषांना बोलावून आणले.
१७. मी त्यांना कासिफ्या नावाच्या स्थानाचा नायक इद्दो ह्याच्याकडे पाठवले आणि आमच्याकडे आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सेवाचाकरी करणारे घेऊन यावेत म्हणून कासिफ्या येथे इद्दो व त्याचे बांधव नथीनीम ह्यांना काय सांगावे हे मी त्यांना कळवले.
१८. आमच्या देवाचा आमच्यावर वरदहस्त असल्यामुळे त्यांनी आमच्याकडे महली बिन लेवी बिन इस्राएल ह्याच्या वंशातला एक समंजस मनुष्य आणला; आणि शेरेब्या व त्याचे पुत्र व बांधव असे अठरा जण आणले;
१९. हशब्या व त्याच्याबरोबर मरारी वंशातील यशाया आणि त्याचे बांधव व पुत्र मिळून वीस जण आणले.
२०. याशिवाय दावीद व सरदार ह्यांनी लेव्यांच्या सेवेसाठी नेमून दिलेल्या नथीनीमांपैकी दोनशे वीस आणले; ह्या सर्वांची नावे नोंदली.
२१. मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.
२२. वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार ह्यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली; कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की, “आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरदहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रकट होतात.”
२३. ह्यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली ती त्याने ऐकली.
२४. मग मी याजकांपैकी शेरेब्या, हशब्या व त्यांचे दहा बांधव अशा बारा प्रमुख पुरुषांना निराळे केले.
२५. जे सोनेरुपे व जी पात्रे राजा, त्याचे मंत्री, त्याचे सरदार व तेथे असलेले सर्व इस्राएल ह्यांनी आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ अर्पण केली होती ती तोलून मी त्यांच्या स्वाधीन केली;
२६. मी त्यांच्या हाती साडेसहाशे किक्कार चांदी, शंभर किक्कार चांदीची पात्रे, शंभर किक्कार१ सोने,
२७. हजार दारिक२ सोन्याचे वीस कटोरे आणि सुवर्णतुल्य उजळ पितळेची दोन पात्रे मी त्यांना तोलून दिली.
२८. मी त्यांना म्हणालो, “तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहात, व ही पात्रेही पवित्र आहेत; हे सोनेरुपे तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ स्वसंतोषाचे अर्पण म्हणून आहे.
२९. सावध राहा; यरुशलेमेत मुख्य याजक, लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळातले सरदार ह्यांच्यासमोर परमेश्वराच्या मंदिराच्या कोठड्यांत ही सर्व तोलून होईपर्यंत ह्यांचे रक्षण करा.”
३०. मग यरुशलेमेतील आमच्या देवाच्या मंदिराप्रत नेण्यासाठी याजक व लेवी ह्यांनी ते सोनेरुपे व ती पात्रे तोलून घेतली.
३१. पहिल्या महिन्याच्या द्वादशीस अहवा नदीपासून कूच करून आम्ही यरुशलेमेचा मार्ग धरला. आमच्या देवाचा वरदहस्त आमच्यावर असल्यामुळे त्याने शत्रूंपासून व वाटेत घात करण्यास टपून बसणार्‍यांपासून आमचे रक्षण केले.
३२. आम्ही यरुशलेमेस पोहचून तेथे तीन दिवस राहिलो.
३३. चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.
३४. त्या सर्व वस्तू मोजून तोलल्या व त्या सर्व तोलाची त्या वेळी नोंद केली.
३५. परदेशातील बंदिवासातून परत आलेल्यांनी इस्राएलाच्या देवाला होमबली अर्पण केले; त्यांनी सर्व इस्राएलासाठी पापार्पण म्हणून बारा गोर्‍हे, शहाण्णव एडके, सत्त्याहत्तर कोकरे व बारा बकरे अर्पण केले; ही सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणे होती.
३६. मग त्यांनी राजाचे फर्मान महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांतांवरील राजाचे मुतालिक व प्रांताधिपती ह्यांना दिले; त्यांनी इस्राएल लोकांना देवाच्या मंदिराच्या कामी साहाय्य केले.
१. कोरहपुत्रांचे संगीतस्तोत्र, मुख्य गवयासाठी; महलथ लेअन्नोथ ह्या चालीवर गायचे, एज्राही हेमान ह्याचे मस्कील (बोधपर स्तोत्र). हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो;
२. माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो; माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे;
३. कारण माझा जीव क्लेशांनी व्यापला आहे; माझा प्राण अधोलोकाजवळ जाऊन पोहचला आहे.
४. गर्तेत पडणार्‍यांत माझी गणना झाली आहे; मी निराधार वीरासारखा झालो आहे;
५. मला प्रेतांमध्ये टाकले आहे; वध होऊन जे कबरेत पडले आहेत, ज्यांची आठवण तू कधी करीत नाहीस, ज्यांचा तुझ्या हाताचा आधार तुटला आहे, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
२१. जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात.
२२. सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
१६. ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या भाच्याने ऐकले, आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.
१७. तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.”
१८. तेव्हा त्याने त्याला सरदाराकडे नेऊन म्हटले, “बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, ह्या तरुणाला आपणाकडे आणावे, त्याला आपणाबरोबर काही बोलायचे आहे.”
१९. तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्याला एकीकडे नेऊन विचारले, “तुला मला काय सांगायचे आहे?”
२०. तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करण्याच्या निमित्ताने त्याला उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.
२१. तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्याला जिवे मारीपर्यंत आम्ही खाणारपिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहेत.”
२२. तेव्हा, “तू हे मला कळवले आहेस हे कोणाला सांगू नकोस,” असे त्या तरुणाला बजावून सरदाराने त्याला निरोप दिला.
२३. मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी रात्रीच्या तिसर्‍या ताशी तयार ठेवा;
२४. आणि पाठाळे मिळवा. त्यांवर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सांभाळून न्या.”
२५. शिवाय त्याने अशा मजकुराचे पत्र लिहिले:
२६. “महाराज फेलिक्स सुभेदार ह्यांना क्लौद्य लुसिया ह्याचा सलाम.
२७. ह्या मनुष्याला यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्याला सोडवले;
२८. आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्याला त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.
२९. तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.
३०. ह्या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठवले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे. [सुखरूप असावे.]”
३१. शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले;
३२. आणि दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले.
३३. कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.
३४. पत्र वाचून त्याने विचारले, “हा कोणत्या प्रांताचा आहे?” तो किलिकियाचा आहे असे समजल्यावर
३५. त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन;” आणि ‘त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकूम सोडला.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide