बायबल एकाच वर्षात

१. हे ऐकून हिज्कीया राजा आपली वस्त्रे फाडून व गोणपाट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला.
२. तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वडील ह्यांना गोणपाट नेसलेले असे त्याने आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे पाठवले.
३. ते त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की, ‘आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.
४. तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’
५. ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले.
६. तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा: ‘परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत, त्यामुळे तू घाबरू नकोस.
७. पाहा, मी त्याला अशी काही प्रेरणा देईन की तो कसली तरी अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व आपल्याच देशात तो तलवारीने पडेल, असे मी करीन.”’
८. नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराबरोबर लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून राजाने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती.
९. मग कूशाचा राजा तिर्‍हाका आपणांशी लढायला निघाला आहे असे कोणी बोलताना त्याने ऐकले. हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,
१०. “तुम्ही यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्याकडे जाऊन सांगा, ‘ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, यरुशलेम अश्शूरी राजाच्या हाती लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.
११. अश्शूरी राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा! त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय?
१२. गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला; त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?
१३. हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, सफरवाईम शहर, हेना व इव्वा ह्यांचा राजा हे कोठे आहेत?”’
१४. हिज्कीयाने जासुदांच्या हातून ते पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिरात जाऊन ते परमेश्वरापुढे उघडून ठेवले.
१५. मग हिज्कीयाने परमेश्वराची अशी प्रार्थना केली:
१६. “सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस, तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस.
१७. हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा; आणि तुझा, सदाजीवी देवाचा उपमर्द करण्यासाठी सन्हेरीबाने निरोप पाठवला आहे. त्याचे सर्व शब्द ऐक.
१८. हे परमेश्वरा, खरोखर अश्शूरच्या राजांनी सर्व देश व त्यांतली जमीन ओसाड केली आहे,
१९. त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते मनुष्यांच्या हातांनी घडलेले काष्ठपाषाण होते; म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.
२०. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातांतून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.”
२१. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो: ‘अश्शूरी राजा सन्हेरीब ह्याच्यासंबंधाने तू माझी प्रार्थना केली;
२२. तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे की, ‘सीयोनेची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तू पाठमोरा झालेला पाहून आपले मस्तक हलवते.
२३. तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्यास? इस्राएलाचा जो पवित्र प्रभू त्याच्यावर?
२४. तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.
२५. मी जमीन खणून पाणी प्यालो; माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन.
२६. तू ऐकलेस ना? मी हे फार पूर्वीच केले, अगदी प्राचीन काळी योजले असून आता असे घडवून आणले की तुझ्या हातून तटबंदीच्या नगरांचा विध्वंस व नासधूस व्हावी;
२७. म्हणून त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवळ, हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, कोवळे शेत ह्यांसारखे ते झाले.
२८. तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरला संताप मला ठाऊक आहे.
२९. माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’
३०. आता तुला हे चिन्ह देतो: यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याला खोडवा फुटेल तो खाल; तिसर्‍या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा.
३१. यहूदाच्या घराण्यातील निभावलेला अवशेष पुन्हा खाली मूळ धरील व वर फळ देईल.
३२. कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील; सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
३३. म्हणून अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; ह्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन ह्याच्याशी सामना करणार नाही आणि ह्यावर मोर्चा रचणार नाही.
३४. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; असे परमेश्वर म्हणतो.
३५. आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा बचाव होईल असे मी ह्याचे रक्षण करीन.”
३६. मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!
३७. ह्याप्रमाणे अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.
३८. तेव्हा असे झाले की तो आपले दैवत निस्रोख ह्याच्या देवळात पूजा करीत असता त्याचे पुत्र अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याला तलवारीने वधले व ते अरारात देशात पळून गेले. मग त्याच्या जागी त्याचा पुत्र एसर-हद्दोन राजा झाला.
१. त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.”
२. तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली.
३. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.
४. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो हा:
५. हिज्कीयास जाऊन सांग की, “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो.
६. मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन.
७. परमेश्वर जे बोलला आहे, ते करीलच, ह्याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे:
८. पाहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायर्‍यांवर सूर्याबरोबर छाया दहा पायर्‍या उतरली आहे, तिला परत दहा पायर्‍या वर आणतो.” तेव्हा सूर्याबरोबर छाया दहा पायर्‍या उतरली होती ती दहा पायर्‍या मागे सरकली.
९. यहूदाचा राजा हिज्कीया दुखण्याने पडला होता तो त्यातून वाचल्यावर त्याने लेख लिहिला तो हा:
१०. मी म्हटले, माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत१ मी अधोलोकाच्या द्वारात प्रवेश करीन; माझ्या आयुष्याची अवशिष्ट वर्षे माझ्यापासून हिरावून घेतली आहेत.
११. मी म्हटले, मला परमेशाचे, जिवंतांच्या भूमीवर असता परमेशाचे दर्शन होणार नाही; मी जगातील रहिवाशांसह राहून२ मनुष्य माझ्या दृष्टीस इत:पर पडणार नाही.
१२. माझे घर मोडले आहे, ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे; कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे; तो मागाच्या ताण्यांतून मला तोडणार आहे; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील.
१३. सकाळपर्यंत मी आपले मन शांत करीत राहिलो; तो सिंहाप्रमाणे माझी सर्व हाडे मोडणार; दिवस जाऊन रात्र येईल तेव्हा तू माझा अंत करशील.
१४. निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो; पारव्याप्रमाणे मी घुमलो; वर पाहून पाहून माझे डोळे शिणले. हे परमेश्वरा, माझ्यावर गहजब झाला आहे, मला जामीन हो.
१५. आता मी काय सांगू? त्याने मला वचन दिले व त्याप्रमाणे केलेही; माझ्या जिवाच्या पीडेस्तव माझी सर्व वर्षे मी संथपणे क्रमीन.
१६. हे प्रभू, अशा गोष्टीच्या योगे लोक जीव धरून राहतात; त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे; म्हणून तूच मला बरे कर व जिवंत ठेव.
१७. पाहा, माझ्या बर्‍यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत.
१८. अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही; शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत.
१९. जिवंत, जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करतो तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करतो.
२०. परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे; म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू; ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू.”
२१. यशयाने सांगितले होते की, “अंजिराची एक चांदकी आणून गळवावर बांधा म्हणजे त्याला गुण पडेल.”
२२. हिज्कीयाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन ह्याचे चिन्ह काय?”
१४. त्याच्या वाडवडिलांच्या अनीतीचे परमेश्वराला स्मरण राहो; त्याच्या आईचे पातक काढून टाकले न जावो.
१५. त्याची पातके परमेश्वरापुढे सदा राहोत; तो पृथ्वीवरून त्यांचे स्मरण नाहीसे करो.
१६. कारण त्या मनुष्याने दया करण्याची आठवण ठेवली नाही, तर दीन, दरिद्री व दुःखी माणसांचा वध करण्यासाठी तो त्यांच्या पाठीस लागला.
१७. शाप देण्याची त्याला आवड असे म्हणून तो शाप त्यालाच लागो; आशीर्वाद देण्याची त्याला आवड नसे म्हणून तो आशीर्वादाला मुको.
१८. शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता, म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडांत तेलासारखे भिनून जावो.
१९. ते त्याला पांघरायच्या वस्त्राप्रमाणे होवो, नेहमी वापरायच्या कंबरपट्ट्याप्रमाणे ते त्याला जखडून राहो.
२०. माझ्या विरोध्यांना, माझ्याविरुद्ध वाईट बोलणार्‍यांना परमेश्वराकडून हेच प्रतिफळ मिळो.
१. उन्हाळ्यात जसे बर्फ, कापणीच्या समयी जसा पाऊस तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही.
१. गलतीयातील मंडळ्यांना: मनुष्यांकडून नव्हे, किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले तो देवपिता, ह्यांच्या द्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या-बरोबरच्या सर्व बंधूंकडून:
२.
३. देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
४. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.
५. देवपित्याला१ युगानुयुग गौरव असो. आमेन.
६. मला आश्‍चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात;
७. ती दुसरी नाही; पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत.
८. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.
९. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो.
१०. मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
११. कारण बंधूंनो, मी तुम्हांला हे कळवतो की, मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही.
१२. कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.
१३. यहूदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे;
१४. आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.
१५. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची२ मसलत न घेता,
१६.
१७. आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, मी लगेच अरबस्तानात निघून गेलो; व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.
१८. मग तीन वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो, व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो.
१९. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही; मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला.
२०. तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे ते खोटे लिहीत नाही; हे मी देवासमक्ष सांगतो.
२१. मग सूरिया व किलिकिया ह्या प्रांतांत मी आलो.
२२. तेव्हा ख्रिस्तामध्ये असणार्‍या यहूदीयातील मंडळ्यांना माझी तोंडओळख नव्हती;
२३. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, “पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करत असे, त्याची तो आता घोषणा करत आहे.”
२४. आणि ते माझ्यावरून देवाचा गौरव करत असत.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide