१. दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला.
२. दाविदाने सांगितले की, लेव्यांवाचून दुसर्या कोणीही देवाचा कोश उचलू नये; कारण देवाचा कोश उचलण्यास व देवाची सेवा निरंतर करण्यास त्यांना परमेश्वराने निवडले आहे.”
३. परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्राएलास यरुशलेमेत एकत्र केले.
४. त्याप्रमाणेच दाविदाने अहरोनाचे वंशज व लेवी ह्यांना एकत्र केले.
५. कहाथी वंशातला प्रमुख उरीएल व त्याचे भाऊबंद एकशे वीस;
६. मरारीच्या वंशजांतला मुख्य असाया व त्याचे भाऊबंद दोनशे वीस;
७. गेर्षोमाच्या वंशजातला मुख्य योएल व त्याचे भाऊबंद एकशे तीस;
८. अलीसाफानाच्या वंशजांतला मुख्य शमाया व त्याचे भाऊबंद दोनशे;
९. हेब्रोनाच्या वंशजांतला मुख्य अलीएल व त्याचे भाऊबंद ऐंशी;
१०. उज्जीएलाच्या वंशजांतला मुख्य अम्मीनादाब व त्याचे भाऊबंद एकशे बारा;
११. दाविदाने सादोक, अब्याथार याजक, उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल व अम्मीनादाब ह्या लेव्यांना बोलावून आणून सांगितले की,
१२. “तुम्ही लेव्यांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष आहात; तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा.
१३. पूर्वीच्या प्रसंगी तुम्ही तो वाहून आणला नाही, आणि आपण आपला देव परमेश्वर ह्याला विधीप्रमाणे भजलो नाही म्हणून त्याने आपल्याला तडाखा दिला.”
१४. ह्यावरून याजक व लेवी हे इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा कोश घेऊन जाण्यासाठी शुचिर्भूत झाले.
१५. मोशेने परमेश्वराच्या सांगण्यावरून आज्ञा केली होती तिला अनुसरून लेव्यांनी त्या कोशाला लावलेल्या काठ्या आपल्या खांद्यांवर घेऊन कोश वाहिला.
१६. दाविदाने लेव्यांच्या प्रमुखांना आज्ञा केली की सतार, वीणा व झांजा अशी वाद्ये वाजवून आनंदाने उच्च स्वराने गायन करतील असे तुमच्या भाऊबंदांतले गायक नेमा.
१७. तेव्हा लेव्यांनी हेमान बिन योएल आणि त्याच्या भाऊबंदांपैकी आसाफ बिन बरेख्या व त्यांचे बांधव मरारीवंशज ह्यांच्यातला एथान बिन कुशाया ह्यांना नेमले;
१८. आणि त्यांचे भाऊबंद जखर्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यइएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम व ईयेल हे जे द्वारपाळ होते त्यांना दुय्यम दर्जाचे नेमले.
१९. हेमान, आसाफ व एथान ह्या गवयांना पितळेच्या झांजा वाजवून गजर करण्यासाठी नेमले;
२०. आणि जखर्या, अजीएल, शमीरामोथ, यइएल. उन्नी, अलीयाब, मासेया व बनाया ह्यांना अलामोथ१ ह्या रागावर सारंगी वाजवण्यासाठी नेमले;
२१. आणि मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, यइएल व अजज्या ह्यांना शमीनीथ१ सुरावर वीणा वाजवायला नेमले.
२२. कनन्या लेव्यांचा मुख्य गायक२ होता; तो रागरागिणींची तालीम देत असे, कारण त्या कामी तो निपुण होता.
२३. बरेख्या व एलकाना हे कोशाचे द्वारपाळ होते.
२४. शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्या, बनाया व अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे कर्णे वाजवीत; ओबेद-अदोम व यहीया हे कोशाचे द्वारपाळ होते.
२५. दावीद, इस्राएलाचे वडील जन व सहस्रपती हे सर्व एकत्र होऊन परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी तिकडे गेले.
२६. देवाने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी लेव्यांना साहाय्य केले तेव्हा त्यांनी सात बैल व सात मेंढे ह्यांचा यज्ञ केला.
२७. दावीद, कराराचा कोश वाहणारे सर्व लेवी, गायक व मुख्य गायक कनन्या ह्या सर्वांनी तलम सणाचे झगे परिधान केले होते; दाविदाने तागाचे एफोद घातले होते.
२८. ह्या प्रकारे सगळ्या इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश जयजयकार करीत, रणशिंग, कर्णे व झांजा वाजवीत आणि सतारी व वीणा ह्यांचा नाद काढत समारंभाने वर आणला.
२९. परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा नाचत व बागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.
१. लोकांनी देवाचा कोश आणून त्यासाठी दाविदाने तयार केलेल्या तंबूत तो नेऊन ठेवला व त्यांनी देवापुढे होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.
२. दाविदाने होमबली व शांत्यर्पणे ह्यांची समाप्ती केल्यावर परमेश्वराच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.
३. त्याने इस्राएलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एकेक भाकर, एकेक मांसाचा तुकडा व खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली.
४. मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवाचाकरी करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा गुणानुवाद व उपकारस्मरण करण्यास काही लेवी नेमले;
५. प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखर्या, यहीएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, व यइएल हे सतार व वीणा वाजवत असत आणि आसाफ झांज वाजवत असे;
६. आणि बनाया व याहजिएल हे याजक देवाच्या कराराच्या कोशापुढे नित्य कर्णे वाजवत असत.
७. त्या दिवशी प्रथम दाविदाने परमेश्वराचे स्तोत्र म्हणण्याचे काम आसाफ व त्याचे बांधव ह्यांना सांगितले; ते स्तोत्र हे:
८. परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.
९. त्याला त्याची स्तोत्रे गा; त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा.
१०. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा; ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.
११. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांवर भरवसा ठेवा; त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा.
१२. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा;
१३. त्याचा सेवक इस्राएल ह्याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या याकोबाच्या वंशजांनो, तुम्ही असे करा.
१४. तो परमेश्वर आमचा देव आहे; त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत.
१५. त्याच्या कराराचे निरंतर स्मरण करा, हजारो पिढ्यांसाठी त्याने आज्ञापिलेले वचन आठवा;
१६. हा करार त्याने अब्राहामाशी केला आणि त्याविषयी इसहाकाशी शपथ वाहिली,
१७. ती त्याने याकोबासाठी नियम, इस्राएलासाठी सर्वकाळचा करार ह्या रूपाने कायम केली;
१८. तो म्हणाला, “कनान देश तुझा वतनभाग म्हणून तुला देईन”
१९. त्या वेळी तुम्ही मोजके, फार थोडे होता, व त्या देशात तुम्ही उपरे होता.
२०. ते राष्ट्राराष्ट्रांतून, एका राज्यातून दुसर्या लोकांत हिंडले.
२१. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की,
२२. “माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”
२३. हे सर्व पृथ्वी, परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा.
२४. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
२५. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.
२६. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे
२७. तेज व प्रताप ही त्याच्यापुढे आहेत; सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत.
२८. अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.
२९. परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
३०. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो; जग स्थिर स्थापलेले आहे, ते डळमळत नाही.
३१. आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, राष्ट्रांमधल्या लोकांना विदित करा की, “परमेश्वर राज्य करतो!”
३२. समुद्र व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत;
३३. म्हणजे वनांतील झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील; कारण पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे;
३४. परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; त्याची दया सनातन आहे.
३५. असे म्हणा: “हे आमच्या तारणार्या देवा, आम्हांला तार; आम्हांला राष्ट्रांतून सोडवून घेऊन एकत्र कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नामाचे उपकारस्मरण करू, आणि तुझ्या स्तवनातच आम्हांला उल्हास वाटेल.
३६. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत धन्यवाद होवो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
३७. कोशापुढे दररोज गरज पडेल त्याप्रमाणे सतत सेवा करावी म्हणून दाविदाने आसाफ व त्याचे भाऊबंद ह्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर राहण्यासाठी नेमले;
३८. तसेच ओबेद-अदोम व त्याचे अडुसष्ट भाऊबंद आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम व होसा ह्यांना द्वारपाळ केले.
३९. आणखी त्याने सादोक याजक व त्याचे याजक भाऊबंद ह्यांची गिबोन येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर योजना केली;
४०. त्यांनी नित्य सकाळ-संध्याकाळ होमवेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ होम अर्पावेत. अर्थात परमेश्वराने इस्राएलास विहित केलेल्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्या सर्वांप्रमाणे त्यांनी करावे अशी व्यवस्था केली.
४१. “परमेश्वराची दया सनातन आहे” म्हणून त्याचा धन्यवाद करण्यासाठी त्याच्याबरोबर हेमान व यदूथून व इतर नावे घेऊन निवडलेले लोक होते.
४२. त्यांच्याबरोबर हेमान व यदूथून कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून देवाप्रीत्यर्थ गायनवादन करीत; यदूथूनाच्या पुत्रांना द्वारपाळ केले.
४३. मग सर्व लोक आपापल्या घरी गेले; आणि आपल्या घराण्यास आशीर्वाद द्यावा म्हणून दावीद आपल्या घरी गेला.
१२. मिसर देशात सोअनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली.
१३. त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले.
१४. दिवसा मेघ व रात्रभर अग्निप्रकाश ह्यांच्या योगे तो त्यांना नेत असे.
१५. त्याने रानात खडक फोडून खोल जलाशयाप्रमाणे भरपूर पाणी त्यांना पिण्यास दिले.
१६. त्याने खडकातून पाण्याचे झरेही काढले, नद्यांप्रमाणे पाणी वाहवले.
२३. परमेश्वराचे भय जीवनप्राप्तीचा मार्ग होय; जो ते धरतो तो सुखाने नांदतो. त्याचे वाईट होणार नाही.
२४. आळशी एकदा आपला हात ताटात घालतो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही.
४४. तू ‘जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर,’ असे ‘ज्याने मोशेला सांगितले’ त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता.
४५. जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ‘ताब्यात घेतला’, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.
४६. दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी१ वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली,
४७. आणि ‘शलमोनाने त्याच्यासाठी घर बांधले’.
४८. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे:
४९. परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?
५०. माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय?’
५१. अहो ‘ताठ मानेच्या’ आणि ‘हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो,’ तुम्ही तर ‘पवित्र आत्म्याला’ सर्वदा ‘विरोध करता;’ जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.
५२. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्याला धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात.
५३. अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते; पण तुम्ही ते पाळले नाही.”
५४. त्याचे हे भाषण ऐकणार्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.
५५. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला;
५६. आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”
५७. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.
५८. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले; आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली.
५९. ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”
६०. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide