१. मग मुख्य याजक एल्याशीब व त्याचे याजकबांधव उठून मेंढेवेस बांधू लागले; त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली; हमेआ बुरुजापर्यंत, हनानेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली.
२. त्याच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी बांधकाम केले; आणि त्यांच्या शेजारी जक्कूर बिन इम्री ह्याने बांधकाम केले.
३. मत्स्यवेस हस्सनाच्या पुत्रांनी बांधली; त्यांनी तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले.
४. त्यांच्या शेजारी मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या बिन मशेजबेल ह्याने डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सादोक बिन बाना ह्याने डागडुजी केली.
५. त्यांच्या शेजारी तकोवाकरांनी डागडुजी केली; पण त्यांच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामाचे जू घेतले नाही.
६. जुन्या वेशीची डागडुजी यहोयादा बिन पासेहा व मशुल्लाम बिन बसोदया ह्यांनी करून तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले.
७. त्यांच्या शेजारी मलत्या गिबोनी व यादोन मेरोनोथी ह्यांनी आणि गिबोन व मिस्पा येथील जे लोक महानदाच्या पश्चिमेकडील प्रांतांच्या अधिपतीच्या सत्तेखाली होते त्यांनी डागडुजी केली.
८. त्यांच्या शेजारी सोनारांपैकी उज्जीएल बिन हरहया ह्याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी गांध्यांपैकी हनन्या ह्याने डागडुजी केली. त्यांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमेची मजबुती केली.
९. त्यांच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी रफाया बिन हूर ह्याने डागडुजी केली.
१०. त्यांच्या शेजारी यदाया बिन हरूमफ ह्याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी हत्तूश बिन हशबन्या ह्याने डागडुजी केली.
११. मल्कीया बिन हारीम आणि हश्शूब बिन पहथ-मवाब ह्यांनी दुसर्या एका भागाची व भट्टीबुरुजाची डागडुजी केली.
१२. त्याच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी शल्लूम बिन हल्लोहेश व त्याच्या कन्या ह्यांनी डागडुजी केली.
१३. खोरेवेशीची डागडुजी हानून व जानोहेकरांनी केली; त्यांनी ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले, तसेच उकिरडावेशीपर्यंत एक हजार हात कोट बांधला.
१४. उकिरडावेशीची डागडुजी बेथ-हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी मल्कीया बिन रेखाब ह्याने केली; त्याने ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले.
१५. झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लूम बिन कोल-होजे ह्याने केली; तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लावले; तसेच त्याने दावीदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधला.
१६. त्याच्यानंतर बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी नहेम्या बिन अजबूक ह्याने डागडुजी केली; ती त्याने दाविदाच्या थडग्यासमोर, तेथे केलेल्या तळ्यापर्यंत, वीरगृह नामक ठिकाणापर्यत केली.
१७. त्याच्यानंतर लेव्यांपैकी रहूम बिन बानी ह्याने डागडुजी केली. त्याच्याजवळच कईला जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्या ह्याने आपल्या जिल्ह्यातर्फे डागडुजी केली.
१८. त्याच्यानंतर त्याच्या भाऊबंदांपैकी कईला जिल्ह्याच्या दुसर्या अर्ध्या भागाचा अधिकारी बवई बिन हेनादाद ह्याने डागडुजी केली.
१९. त्याच्या शेजारी दुसर्या एका भागी जेथे कोट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते तेथे मिस्पाचा अधिकारी एजेर बिन येशूवा ह्याने डागडुजी केली.
२०. त्याच्यानंतर कोट वळसा घेतो तेथून मुख्य याजक एल्याशीब ह्याच्या घराच्या दारापर्यंत बारूख बिन जब्बई ह्याने आस्थेने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
२१. त्याच्यानंतर एल्याशिबाच्या घराच्या दारापासून एल्याशिबाच्या घराच्या शेवटापर्यंत मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
२२. त्याच्यानंतर तळवटीत राहणारे याजक ह्यांनी डागडुजी केली.
२३. त्याच्यानंतर बन्यामीन व हश्शूब ह्यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडुजी केली. त्यांच्या शेजारी अजर्या बिन मासेया बिन अनन्या ह्याने आपल्या घरानजीक डागडुजी केली.
२४. त्याच्यानंतर अजर्याच्या घरापासून कोट वळसा घेतो तेथवर व कोपर्यापर्यंत बिन्नुई बिन हेनादाद ह्याने दुसर्या एका भागाची डागडुजी केली.
२५. कोट वळसा घेतो त्यासमोर गारद्यांच्या अंगणाजवळ राजमंदिराबाहेर असलेल्या उंच बुरुजाची डागडुजी पलाल बिन उजई ह्याने केली. त्याच्या शेजारी पदाया बिन परोश ह्याने डागडुजी केली.
२६. (नथीनीम हे ओफेलात, पूर्वेकडल्या पाणीवेशीसमोर व पुढे आलेल्या बुरुजापर्यंत राहत होते.)
२७. पदायाच्या शेजारी पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोर ओफेलच्या कोटापर्यंत तकोवाकरांनी डागडुजी केली.
२८. घोडेवेशीपासून याजकांनी आपापल्या घरांपुढे डागडुजी केली.
२९. त्यांच्या शेजारी सादोक बिन इम्मेर ह्याने आपल्या घरापुढच्या भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी पूर्ववेशीचा द्वारपाळ शमाया बिन शखन्या ह्याने डागडुजी केली.
३०. त्याच्या शेजारी हनन्या बिन शलेम्या आणि सालफाचा सहावा पुत्र हानून ह्यांनी दुसर्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या ह्याने आपल्या कोठडीपुढे डागडुजी केली.
३१. त्याच्या शेजारी सोनारांपैकी मल्कीया ह्याने नथीनीम व व्यापारी ह्यांच्या घरांपर्यंत सभावेशीसमोर कोपर्यावरच्या कोठीपर्यंत डागडुजी केली.
१. आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला.
२. तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य ह्यांच्यासमोर म्हणाला, “हे दुर्बळ यहूदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगार्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय?”
३. त्याच्याजवळ अम्मोनी तोबीया होता तो म्हणाला, “ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.”
४. हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे; ते निर्भर्त्सना करीत आहेत ती त्यांच्या शिरी उलट आण; बंदिवासाच्या देशात त्यांची लूट होऊ दे.
५. त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको, त्यांची पातके तुझ्यापुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणार्यांसमोर तुला संताप आणला आहे.
६. ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले; तो कोट निम्मा तयार झाला; कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते.
७. यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला;
८. त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे गोंधळ उडवून देऊ.
९. पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली.
१०. यहूदी लोक म्हणू लागले की, “भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे, व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही.”
११. आमचे शत्रू म्हणाले, “आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळायचे नाही की दिसायचे नाही.”
१२. मग जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन म्हणाले की, “तुम्ही आमच्याकडे परत या.”
१३. ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले.
१४. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”
१५. देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो.
१६. त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करत आणि यहूदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत.
१७. कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करत व दुसर्या हातात शस्त्रे धारण करत.
१८. बांधकाम करणारे आपल्या कंबरेस तलवार लावून काम करत. रणशिंग वाजवणारा माझ्याजवळ असे.
१९. मी सरदारांना, शास्त्यांना व वरकड लोकांना सांगून ठेवले होते की, “हे काम मोठे व विस्तृत असून कोटावर काम करत असता आपण एकमेकांपासून दूर असतो.
२०. तर रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येईल तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा; आपला देव आपल्यातर्फे लढेल.”
२१. ह्या प्रकारे आम्ही काम करू लागलो; त्यांच्यातले अर्धे लोक पहाटेपासून तारे दिसू लागत तोपर्यंत भाले घेऊन उभे असत.
२२. त्या वेळी लोकांना मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुशलेमेच्या आतच रात्रीचे बिर्हाडास राहावे म्हणजे ते रात्री आमची रखवाली करतील आणि ते दिवसा काम करतील.”
२३. मी आपले कपडे उतरवीत नसे; तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्यामागून चालणारे गारदी कोणीही आपले कपडे उतरवीत नसत; ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात.
१. तेव्हा लोकांनी व त्यांच्या स्त्रियांनी आपल्या यहूदी भाऊबंदांविरुद्ध मोठी ओरड केली.
२. कित्येक म्हणू लागले की, “आम्ही आमचे पुत्र व कन्या मिळून बहुत जण आहोत, म्हणून आम्हांला जगण्यासाठी धान्य मिळाले पाहिजे.”
३. कित्येक म्हणू लागले की, “धान्य मिळावे म्हणून महागाईमुळे आम्ही आमची शेते, द्राक्षांचे मळे व घरे गहाण ठेवली आहेत.”
४. दुसरे कित्येक म्हणू लागले की, “राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यांवर आम्ही पैसा काढला आहे.
५. वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंदांच्या शरीरां-सारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पाहा, आम्ही आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेवले आहे; आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत; त्यांना सोडवण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसर्यांच्या हाती गेले आहेत.”
६. हे त्यांचे शब्द व ओरड ऐकून मला क्रोध आला.
७. मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्ते ह्यांच्याशी वाद करून म्हणालो की, “तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढीदिढी घेता.” मग मी त्यांच्याविरुद्ध एक मोठी सभा भरवली.
८. मी त्यांना म्हटले की, “जे आपले यहूदी भाऊबंद परराष्ट्रांस विकले गेले होते त्यांची आम्ही शक्तिनुसार सोडवणूक केली; पण तुम्ही आपल्या भाऊबंदांची विक्री चालवली आहे काय? त्यांना तुम्ही आम्हांला विकणार काय?” हे ऐकून ते स्तब्ध राहिले; त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
९. मी आणखी म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात ते ठीक नाही; आपले शत्रू जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नये काय?
१०. तसेच मी, माझे बांधव व माझे सेवक असे आम्ही त्यांना पैसा व धान्य वाढीदिढीने देतो; आपण हा वाढीदिढीचा व्यवहार सोडला पाहिजे.
११. तर आजच्या आज कसेही करून त्यांची शेते, त्यांचे द्राक्षमळे, त्यांची जैतुनवने, त्यांची घरेदारे त्यांना परत द्या, तसेच पैसे, अन्न, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचा जो शतांश तुम्ही त्यांच्यापासून काढत असता तो तुम्ही त्यांना परत द्या.”
१२. तेव्हा ते म्हणाले, “आम्ही त्यांना ती परत देतो; आम्ही त्यांच्यापासून काही मागणार नाही; तू म्हणतोस त्याप्रमाणे आम्ही करतो.” मग मी याजकांना बोलावून आणून आम्ही ह्याप्रमाणे करू, अशी शपथ त्यांच्याकडून घेववली.
१३. ह्यावर मी आपला पदर झटकून म्हणालो, “जो कोणी ह्या वचनाप्रमाणे करणार नाही त्याला परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील ह्याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल.” तेव्हा सर्व मंडळीने म्हटले, “आमेन” व त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले. मग लोकांनी आपण दिलेल्या वचनाप्रमाणे केले.
१४. यहूदा देशात मला त्यांचा अधिपती नेमले तेव्हापासून म्हणजे अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंत बारा वर्षे मी व माझे भाऊबंद ह्यांनी माझ्या अधिपतीच्या वेतनाचे अन्न खाल्ले नाही.
१५. माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी चाळीस शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवकदेखील लोकांवर अधिकार गाजवत, पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते.
१६. मग मी कोटाचे काम नेटाने चालवले; आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही; माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकत्र झाले होते.
१७. दीडशे यहूदी व शास्ते आणि आमच्याभोवतालच्या राष्ट्रांतले जे लोक आमच्याकडे येत तेही माझ्या पंक्तीला असत.
१८. दररोज एक बैल व सहा चांगली मेंढरे शिजवत तसेच माझ्यासाठी पाखरे तयार करत आणि दर दहा दिवसांनी सर्व जातींचा द्राक्षारसही मेजावर येत असे, तरी मी अधिपतीच्या वेतनाचे अन्न सेवन केले नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा फार मोठा होता.
१९. हे माझ्या देवा, जे काही मी ह्या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर.
१. एज्राही एथान ह्याचे मस्कील (बोधपर स्तोत्र). परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन; मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन.
२. कारण मी म्हणालो, तुझ्या दयेची उभारणी सदोदित राहील; स्वर्गात तुझी सत्यता तूच स्थापली आहेस.
३. “मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे; मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे:
४. ‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;” (सेला)
२१. जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात.
२२. सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
२३. जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो, तो संकटांपासून आपला जीव बचावतो.
२४. गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.
२५. आळश्याची वासना त्याला मारून टाकते; कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात.
२६. कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही;
२७. दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?
१. मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले:
२. “अग्रिप्पा राजे, यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्यांत आपण विशेष जाणते आहात, आणि यहूदी ज्यांविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करायचे आहे, ह्यावरून मी स्वतःला धन्य समजतो; आणि मी आपल्याला विनंती करतो की, शांतपणे माझे भाषण ऐकून घ्यावे.
३.
४. तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकांत व यरुशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहूद्यांना माहीत आहे.
५. ते पहिल्यापासून मला ओळखतात; म्हणून त्यांची मर्जी असल्यास ते साक्ष देतील की, आमच्या धर्माच्या अत्यंत कडकडीत पंथाप्रमाणे मी परूशी होतो.
६. आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे;
७. ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.
८. देव मेलेल्यांना उठवतो हे तुमच्यापैकी कित्येकांना अविश्वसनीय का वाटावे?
९. मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात;
१०. आणि तसे मी यरुशलेमेत केलेही; मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले; आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली.
११. प्रत्येक सभास्थानात त्यांना वारंवार शासन करून त्यांना दुर्भाषण करायला लावण्याचा प्रयत्न मी करत असे; त्यांच्यावर अतिशय पिसाळून जाऊन बाहेरच्या नगरांपर्यंतदेखील मी त्यांचा पाठलाग करत असे.
१२. हे चालू असता, मुख्य याजकांकडून अखत्यार व अधिकारपत्र मिळवून, मी दिमिष्काकडे चाललो होतो.
१३. तेव्हा अहो राजे, वाटेवर दोन प्रहरी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणार्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.
१४. तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण.’
१५. मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.
१६. तर ऊठ व आपल्या पायांवर उभा राहा; कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की, तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे, त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे.
१७. ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
१८. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’
१९. म्हणून, अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टान्त अवमानला नाही;
२०. तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्चात्ताप करा आणि पश्चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.
२१. ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारायला पाहत होते.
२२. तथापि देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळे मी आजपर्यंत लहानमोठ्यांस साक्ष देत राहिलो आहे; आणि ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्यांखेरीज मी दुसरे काही सांगत नाही.
२३. त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसणारे व्हावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणार्यांपैकी पहिले होऊन आमच्या लोकांना व परराष्ट्रीयांनाही प्रकाश प्रकट करावा.”
२४. ह्याप्रमाणे तो प्रत्युत्तर करत असता, फेस्त मोठ्याने बोलला, “पौला, तू वेडा आहेस; विद्येचे अध्ययन फार झाल्यामुळे तुझे डोके फिरले आहे.”
२५. पौल म्हणाला, “फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर मी खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी बोलतो.
२६. ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपर्यात घडलेले नाही.
२७. अहो राजे अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? विश्वास आहे, हे मला ठाऊक आहे.”
२८. तेव्हा अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस!”
२९. पौल म्हणाला, “थोडके किंवा फार, कसेही असो; पण केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी ह्या बंधनांशिवाय माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.”
३०. त्याने असे म्हटल्यावर राजा, सुभेदार, बर्णीका व त्यांच्याबरोबर जे बसले होते ते उठले;
३१. आणि एकीकडे जाऊन आपापसांत म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास पात्र व्हावे असे काही केले नाही.”
३२. तेव्हा अग्रिप्पाने फेस्ताला म्हटले, “ह्या माणसाने कैसराजवळ न्याय मागितला नसता तर त्याला मोकळे करता आले असते.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide