१. पुढे अम्मोनी लोकांचा राजा नाहाश मृत्यू पावला व त्याच्या गादीवर त्याचा पुत्र बसला.
२. तेव्हा दाविदाने मनात आणले की, “हानूनाचा बाप नाहाश ह्याने आपल्यावर दया केली तशीच आपण त्याच्या पुत्रावर करावी,” म्हणून दाविदाने त्याच्या बापाच्या मृत्यूबद्दल त्याचे समाधान करण्यासाठी जासूद पाठवले. हानूनाचे समाधान करायला दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले,
३. त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार हानूनास म्हणाले की, “दाविदाने तुझे समाधान करायला लोक पाठवले आहेत ते तुझ्या बापाविषयी आदरबुद्धी दर्शवण्यासाठी पाठवले आहेत असे तुला वाटते काय? ह्या देशाची पाहणी-टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून त्याचे चाकर तुझ्याकडे आले आहेत, नाही काय?”
४. तेव्हा हानूनाने दाविदाच्या चाकरांना पकडून त्यांचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना घालवून दिले.
५. त्या लोकांना कशी वागणूक मिळाली हे कोणी जाऊन दाविदाला सांगितले. हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घेण्यास माणसे पाठवली; कारण त्यांना मोठी लाज वाटत होती. राजाने त्यांना सांगून पाठवले की, “तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे राहा, मग इकडे या.”
६. दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा हानून व अम्मोनी लोक ह्यांनी मेसोपटेम्या, अराम-माका व सोबा येथून रथ व घोडेस्वार आणण्यासाठी एक हजार किक्कार१ रुपे पाठवले.
७. त्यांनी बत्तीस हजार रथ, माकाचा राजा व त्याचे लोक ह्यांना मोल देऊन बोलावले; त्यांनी येऊन मेदबासमोर छावणी दिली. अम्मोनी लोक आपापल्या नगरांतून एकत्र होऊन युद्धास आले.
८. हे ऐकून दाविदाने यवाबाला योद्ध्यांच्या सर्व सैन्यासह पाठवले.
९. तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक व्यूह रचला; जे राजे आले होते ते मैदानात एकीकडे उभे होते.
१०. आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएल लढवय्यांतील निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले;
११. आणि वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्यांनी अम्मोन्यांसमोर आपली व्यूहरचना केली.
१२. तो म्हणाला, “अरामी माझ्याहून प्रबळ होऊ लागले तर तू मला साहाय्य कर आणि अम्मोनी लोक तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुला साहाय्य करीन.
१३. हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढण्याची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”
१४. पुढे यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करण्यास चालून गेले तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले.
१५. अरामी लोक पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबीशयाच्या पुढून पळून जाऊन नगरात शिरले. मग यवाब यरुशलेमास परत आला.
१६. अरामी लोकांनी इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून महानदापलीकडील अराम्यांस आणले; हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोफख ह्याच्या नायकत्वाखाली ते आले.
१७. हे कोणी दाविदाला सांगितले तेव्हा त्याने अवघा इस्राएल एकत्र जमवून व यार्देनेपलीकडे जाऊन त्यांच्यावर चढाई केली आणि सैन्यव्यूह रचला; दाविदाने अराम्यांविरुद्ध व्यूह रचल्यावर ते त्यांच्याशी लढू लागले.
१८. तेव्हा अरामी इस्राएलापुढून पळून गेले; त्या वेळी दाविदाने त्यांच्या सात हजार रथांवरील माणसे व चाळीस हजार पायदळ ह्यांचा संहार केला आणि त्यांचा सेनापती शोफख ह्याला ठार केले.
१९. इस्राएलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजराचे जे अंकित होते ते दाविदाशी तह करून त्याचे अंकित झाले; ह्यानंतर अराम्यांनी अम्मोनी लोकांना साहाय्य केले नाही.
१. राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी यवाबाने आपले सैन्यबळ घेऊन अम्मोनी लोकांचा मुलूख उद्ध्वस्त केला आणि मग येऊन राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमातच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर मारा करून ते उद्ध्वस्त केले.
२. दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या२ मस्तकांवरून मुकुट काढला; त्याचे वजन एक सोन्याचा किक्कार आहे असे त्याला कळून आले; तो रत्नजडित होता; तो दाविदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली.
३. त्याने त्या नगराच्या रहिवाशांना बाहेर काढून करवती, लोखंडी दाताळी व कुर्हाडी ह्यांनी कापले.३ अम्मोन्यांच्या सर्व नगरांचेही त्याने तसेच केले. मग दावीद सर्व लोकांसह यरुशलेमास परत आला.
४. ह्यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले; त्या प्रसंगी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सिप्पय ह्याला जिवे मारले तेव्हा ते लोक शरण आले.
५. पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा याइराचा पुत्र एलहानान ह्याने गथकर गल्याथ ह्याचा भाऊ लहमी ह्याचा वध केला; गल्याथाच्या भावाची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती.
६. गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हातास व पायास सहा-सहा अशी एकंदर चोवीस बोटे होती.
७. त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला.
८. हे पुरुष गथ गावी रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या सेवकांच्या हाताने पडले.
२६. त्याने पूर्वेचा वारा आकाशात वाहवला, आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा आणला.
२७. त्याने त्यांच्यावर धुळीसारखा मांसाचा आणि समुद्राच्या वाळूसारखा पक्ष्यांचा वर्षाव केला;
२८. त्याने त्यांच्या छावणीमध्ये, त्यांच्या वस्तीभोवती ते पाडले.
२९. ते खाऊन ते अगदी तृप्त झाले; अशा रीतीने त्यांची इच्छा त्याने पुरवली.
३०. त्यांची इच्छा पुरी झाली नव्हती, अजून त्यांच्या तोंडी अन्नाचा घास होता,
३१. तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला, आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टांस मारून टाकले, इस्राएलाच्या तरुणांना ठोकून खाली पाडले,
३२. इतके सर्व झाले तरी ते पाप करीतच राहिले, व त्याच्या अद्भुत कृत्यांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
३३. ह्यामुळे त्याने त्यांचे दिवस वाफेसारखे नाहीसे केले व त्यांची वर्षे घोर भयात संपवली.
२७. माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकायचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे.
२९. निंदकांसाठी दंड, व मूर्खास पाठीसाठी फटके सिद्ध केले आहेत.
२६. इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”
२७. मग तो उठला व निघाला; आणि पाहा, एक कूशी१ षंढ, कूशी१ लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते; तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता.
२८. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता.
२९. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.”
३०. फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले; त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?”
३१. त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले.
३२. तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा: “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही.
३३. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.”
३४. तेव्हा षंढाने फिलिप्पाला म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?”
३५. तेव्हा फिलिप्पाने बोलण्यास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.
३६. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”
३७. (फिलिप्पाने म्हटले, “जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.”)२
३८. तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला.
३९. मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही; नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला.
४०. इकडे फिलिप्प अजोत नगरात आढळला आणि कैसरीया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide