१. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे सांगतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.
२. तू त्यांना जाऊ देणार नाहीस आणि त्यांना अजूनही अडवून ठेवशील,
३. तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल.
४. इस्राएलाची गुरेढोरे आणि मिसर्यांची गुरेढोरे ह्यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील; इस्राएल लोकांचे एकही जनावर मरायचे नाही.”’
५. मग परमेश्वराने वेळ ठरवली आणि म्हटले, “उद्या परमेश्वर ह्या देशात ही गोष्ट करील.”
६. दुसर्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही.
७. फारोने माणसे पाठवली तर पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांना जाऊ दिले नाही. गळवांची पीडा
८. नंतर परमेश्वराने मोशे आणि अहरोन ह्यांना सांगितले की, “भट्टीतली ओंजळभर राख१ घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी.
९. मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील माणसे व गुरे ह्यांना त्यामुळे फोड येऊन गळवे होतील.”
१०. ते भट्टीतली राख घेऊन फारोपुढे उभे राहिले; मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे माणसे व गुरे ह्यांना फोड येऊन गळवे झाली.
११. गळवांमुळे जादुगारांना मोशेपुढे उभे राहवेना कारण जादुगार आणि सर्व मिसरी लोक ह्यांना गळवे आली होती.
१२. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.
१३. परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा, आणि त्याला सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.
१४. नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.
१५. कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता;
१६. तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.
१७. तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यांना जाऊ देत नाहीस काय?
१८. पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही.
१९. तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण; जी माणसे व गुरे घरी आसर्यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील.”’
२०. फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवत घरी आणली.
२१. आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास आणि जनावरे रानात राहू दिली.
२२. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आपला हात आकाशाकडे उगार म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल; मिसर देशातील माणसांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवर ती होईल.”
२३. मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली, आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला; ह्या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.
२४. ह्याप्रमाणे गारा पडत असता मधूनमधून अग्नीचा लोळ दिसत होता; ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कोठेही तशी वृष्टी कधी झाली नव्हती.
२५. सर्व मिसर देशात माणसे, गुरेढोरे, वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला; शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले.
२६. मात्र गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत.
२७. तेव्हा फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “मी ह्या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहोत.
२८. तुम्ही परमेश्वराची विनवणी करा; ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे, मी तुम्हांला जाऊ देतो; तुम्हांला इतःपर राहायला नको.”
२९. मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.
३०. तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तुम्ही आणि तुमचे सेवक परमेश्वर देव ह्याला भीत नाहीत.”
३१. त्या समयी जवस व सातू ह्यांचा नाश झाला; कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती.
३२. पण गहू व काठ्यागहू ह्यांचा नाश झाला नाही; कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते.
३३. मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पाऊस पडायचा थांबला.
३४. पाउस, वृष्टी, गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले.
३५. फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही; परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते.
१. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की, त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी.
२. मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.”
३. मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.
४. तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पाहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन;
५. ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल; गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवतील; शेतात तुमची जितकी झाडे वाढत आहेत तीही ते खाऊन टाकतील;
६. तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिसरी लोकांची घरे ते व्यापून टाकतील, इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवरदेखील पाहिले नसतील.”’ मग मोशे मागे फिरून फारोपुढून निघून गेला.
७. फारोचे सेवक त्याला म्हणाले, “हा मनुष्य कोठपर्यंत आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का?”
८. तेव्हा मोशे आणि अहरोन ह्यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा; पण कोणकोण जाणार?”
९. मोशेने म्हटले, “आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यांच्यासह जाऊ; आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार; कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला उत्सव करायचा आहे.”
१०. तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे.
११. असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहात.” मग त्यांना फारोपुढून घालवून दिले.
१२. परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकील.”
१३. मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्याबरोबर टोळ आले.
१४. सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते. ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत.
१५. त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे सार्या देशावर अंधार पडला; आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही.
१६. मग फारोने मोशे आणि अहरोन ह्यांना ताबडतोब बोलावून आणून म्हटले, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.
१७. तर आता एवढ्या एकाच वेळेस माझ्या पापाची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याजवळ विनंती करा.”
१८. तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वराला विनंती केली.
१९. तेव्हा परमेश्वराने पश्चिमेचा प्रचंड वारा वाहवला; त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले; मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही.
२०. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले; आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
२१. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.”
२२. तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला.
२३. तीन दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना; पण इस्राएल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता.
२४. मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, “तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा; पण तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत; तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा.”
२५. मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञपशू आणि होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत;
२६. आमचे पशूही आमच्याबरोबर गेले पाहिजेत, एक खूरही मागे राहता कामा नये; कारण ह्यांतूनच आमचा देव परमेश्वर ह्याच्या सेवेसाठी यज्ञपशू घ्यावे लागतील; आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हांला तेथे जाऊन पोहचेपर्यंत कळायचे नाही.”
२७. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि तो त्यांना जाऊ देईना.
२८. फारो त्याला म्हणाला, “माझ्यापुढून चालता हो आणि सांभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखवशील, त्या दिवशी तू मरशील.”
२९. मोशे म्हणाला, “तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही.”
८. मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव,
९. कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात.
१०. त्यांना चरबी चढली आहे; ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करतात.
११. आता ते पावलोपावली आम्हांला घेरत आहेत; ते आम्हांला धुळीस मिळवू पाहत आहेत.
१२. भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे.
१३. हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव.
१४. हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;
१५. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.
२१. मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो.
२२. दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.
२३. त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो.
१. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे; तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला.
२. आणि त्याने कामकर्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले.
३. मग तो तिसर्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले.
४. तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हांला देईन.’ आणि ते गेले.
५. पुन्हा सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले.
६. मग अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, ‘तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’
७. ते त्याला म्हणाले, ‘आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून.’ त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. जे योग्य ते तुम्हांला मिळेल.’
८. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभार्याला म्हणाला, ‘कामकर्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे.’
९. तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास कामावर घेतले होते ते आल्यावर त्यांना रुपया-रुपया मिळाला.
१०. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले. तरी त्यांनाही रुपया-रुपयाच मिळाला.
११. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले,
१२. ‘ह्या शेवटल्यांनी एकच तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हांला व त्यांना आपण सारखे लेखले.’
१३. तेव्हा त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, ‘गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही; तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही?
१४. तू आपला रुपया घेऊन चालायला लाग; जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे.
१५. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’
१६. ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. [कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.]”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide