१. दावीद आता वृद्ध व वयातीत झाला होता, म्हणून त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला इस्राएलावर राजा नेमले. लेवी आणि याजक ह्यांची विभागणी व त्यांची कामे
२. त्याने इस्राएलाचे सर्व सरदार, याजक व लेवी ह्यांना एकत्र केले.
३. तीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली; त्यांची शिरगणती केली ती अडतीस हजार भरली.
४. त्यांतले चोवीस हजार परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले; सहा हजार अंमलदार व न्यायाधीश होते;
५. चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली.
६. लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते.
७. गेर्षोन्यातले लादान व शिमी;
८. लादानाचे पुत्र यहीएल मुख्य व जेथाम व योएल असे तीन;
९. शिमीचे पुत्र शलोमोथ, हजिएल व हारान असे तीन; हे लादानाच्या पितृकुळांचे मुख्य होते;
१०. आणि शिमीचे पुत्र यहथ, जीजा, यऊश व बरीया; हे चौघे शिमीचे पुत्र;
११. यहथ हा प्रमुख व जीजा हा दुसरा; यऊश व बरीया ह्यांची पुत्रसंतती बहुत नव्हती, म्हणून त्यांचे एकच पितृकुळ ठरवले.
१२. कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;
१३. अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा.
१४. देवाचा माणूस मोशे ह्याचे पुत्र लेवी वंशात मोडत.
१५. मोशेचे पुत्र गेर्षोम व अलियेजर.
१६. गेर्षोमाच्या पुत्रांमध्ये शबुएल मुख्य,
१७. आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते.
१८. इसहाराच्या पुत्रांमध्ये शलोमीथ मुख्य;
१९. हेब्रोनाच्या पुत्रांमध्ये यरीया मुख्य; व अमर्या दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम् चौथा;
२०. उज्जीएलाच्या पुत्रांमध्ये मीखा मुख्य व इश्शिया दुसरा;
२१. मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश;
२२. एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या; त्यांचे भाऊबंद कीशाचे पुत्र ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
२३. मूशीचे पुत्र; महली, एदर व यरेमोथ असे तीन.
२४. लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.
२५. दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपल्या प्रजेस विसावा दिला आहे, व यरुशलेमात त्यांचा निरंतरचा निवास आहे;
२६. निवासमंडप व त्यामधील सेवेची उपकरणे ही लेव्यांना पुन्हा वाहून नेण्याची जरूर पडणार नाही.”
२७. दाविदाच्या शेवटल्या आज्ञेवरून वीस वर्षांच्या व त्यांहून अधिक वयाच्या लेव्यांची गणती झाली.
२८. अहरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिराची अंगणे व कोठड्या ह्यांत सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधीचे सर्व काम त्यांच्याकडे होते.
२९. समर्पित भाकर, अन्नबलीसाठी सपीठ, बेखमीर पापड, तव्यावर भाजलेले अथवा मळलेले सर्वकाही सिद्ध करण्याचे व सर्व प्रकारचे मोजमाप करण्याचे काम त्यांच्याकडे होते.
३०. सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे नित्य उपकारस्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे.
३१. तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.
३२. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.
१. अहरोन वंशजांचे वर्ग हे: अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार.
२. नादाब व अबीहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्रिक मेले म्हणून एलाजार व इथामार हे याजकांचे काम करीत.
३. दाविदाने एलाजाराच्या वंशांतला सादोक व इथामाराच्या वंशातला अहीमलेख ह्यांना त्यांची सेवेची कामे वाटून दिली.
४. इथामाराच्या वंशजांपेक्षा एलाजाराच्या वंशजांत प्रमुख पुरुष अधिक निपजले; त्यांची वाटणी येणेप्रमाणे झाली: एलाजाराच्या वंशातील पितृकुळांचे प्रमुख सोळा होते, आणि इथामाराच्या वंशातील पितृकुळांप्रमाणे आठ होते.
५. ह्याप्रमाणे दोन्ही घराण्यांतले पुरुष घेऊन त्यांची चिठ्ठ्या टाकून वाटणी केली; कारण पवित्रस्थानाचा अधिकार व देवाकडची सरदारी एलाजार व इथामार ह्या दोन्ही वंशांतल्या पुरुषांकडे होती.
६. आणि लेव्यांपैकी नथनेल लेखक ह्याचा पुत्र शमाया ह्याने राजा व अधिकारी, सादोक याजक व अब्याथाराचा पुत्र अहीमलेख आणि लेवी व याजक ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्यासमोर त्यांची नावे लिहिली; एक प्रमुख घराणे एलाजाराचे व एक इथामाराचे अशी धरली.
७. पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली, दुसरी यदायाची,
८. तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
९. पाचवी मलकीयाची, सहावी मीयामिनाची,
१०. सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची,
११. नववी येशूबाची, दहावी शकन्याची,
१२. अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची,
१३. तेरावी हुप्पाची, चौदावी येशेबाबाची,
१४. पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची,
१५. सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
१६. एकोणिसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
१७. एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलाची,
१८. तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
१९. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केली होती त्यानुसार त्यांचा पूर्वज अहरोन ह्याच्या हस्ते त्यांना लावून दिलेल्या विधीप्रमाणे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी पाळीपाळीने जावे म्हणून हा जाण्याचा क्रम त्यांना लावून दिला होता.
२५. मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाच्या वंशातला जखर्या;
२६. मरारीचे पुत्र: महली व मूशी; याजीयाचा वंशज बनो.
२७. मरारीच्या वंशातले याजीयाचे पुत्र: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.
२८. महलीचा एलाजार, ह्याला पुत्र झाला नाही.
२९. कीशाचे वंशज: कीशाचा वंशज यरहमेल.
३०. मूशीचे पुत्र: महली, एदर व यरीमोथ; हे लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांप्रमाणे होते.
३१. ह्यांनीही आपले बांधव अहरोनवंशज ह्यांच्याप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमलेख आणि याजकांच्या व लेव्यांच्या पितृकुळाचे प्रमुख पुरुष ह्यांच्यासमोर चिठ्ठ्या टाकल्या; मुख्य पुरुषाचे पितृकुळ त्याच्या कनिष्ठ बांधवांच्या पितृकुळाबरोबर गणले.
१. दावीद व सेनापती ह्यांनी आसाफ, हेमान व यदूथून ह्यांच्या वंशजांपैकी कित्येकांना वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले. सेवेचे हे काम करणार्यांची संख्या येणेप्रमाणे:
२. आसाफाच्या वंशातले जक्कूर, योसेफ, नथन्या व अशेराला हे आसाफाचे पुत्र; राजाज्ञेप्रमाणे आसाफाच्या हाताखाली हे संदेश देत असत.
३. यदूथूनाचे वंशज: यदूथूनाचे पुत्र गदल्या, सरी, यशाया, हशब्या व मत्तिथ्या असे सहा;१ त्यांचा बाप यदूथून वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण व स्तवन करून संदेश देत असे, ते त्याच्या हाताखाली असत.
४. हेमानाचे वंशज: हेमानाचे पुत्र बुक्कीया, मत्तन्या, उज्जीएल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर व महजियोथ;
५. राजाचा द्रष्टा हेमान, जो रणशिंग वाजवून परमेश्वराचे वचन सांगत असे, त्याचे हे पुत्र; देवाने हेमानाला चौदा पुत्र व तीन कन्या दिल्या.
६. हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आपापल्या बापाच्या हाताखाली राहून देवाच्या मंदिराच्या सेवेत झांजा, सारंगी व वीणा वाजवून गात असत; आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या आज्ञेत असत.
७. ते व त्यांचे भाऊबंद परमेश्वराप्रीत्यर्थ गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले असे दोनशे अठ्ठ्याऐंशी होते.
८. त्या सर्वांनी, लहानमोठ्यांनी आणि गुरुशिष्यांनी चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतली.
९. तेव्हा पहिली चिठ्ठी आसाफाकडील योसेफ ह्याची निघाली; दुसरी गदल्याची; तो, त्याचे भाऊबंद व पुत्र मिळून बारा;
१०. तिसरी जक्कूराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
११. चौथी इस्रीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१२. पाचवी नथन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१३. सहावी बुक्कीयाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१४. सातवी यशरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१५. आठवी यशायाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१६. नववी मत्तन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१७. दहावी शिमीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१८. अकरावी अजरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
१९. बारावी हशब्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२०. तेरावी शूबाएलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२१. चौदावी मतिथ्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२२. पंधरावी यरेमोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२३. सोळावी हनन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२४. सतरावी याश्बाकाशाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२५. अठरावी हनानीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२६. एकोणिसावी मल्लोथीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२७. विसावी अलीयाथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२८. एकविसावी होथीराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
२९. बाविसावी गिद्दल्तीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
३०. तेविसावी महजियोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा;
४०. कितीतरी वेळा त्यांनी रानात त्याच्याविरुद्ध बंडाळी केली! कितीतरी वेळा त्यांनी अरण्यात त्याला दुःख दिले!
४१. पुनःपुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूला चिडवले.
४२. त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांना स्मरण झाले नाही; त्याने त्यांना शत्रूंपासून सोडवले,
४३. त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोअनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली, तो दिवस त्यांनी आठवला नाही.
४४. त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्त केले, म्हणून त्यांचे वाहते पाणी त्यांच्याने पिववेना.
४५. त्याने त्यांच्यावर माश्यांचे थवेच्या थवे पाठवले; त्या माश्यांनी त्यांना ग्रासून टाकले; त्याने बेडूक पाठवले, त्या बेडकांनी त्यांचे सर्वकाही नासून टाकले.
४६. त्याने त्यांच्या शेतातल्या उत्पन्नावर सुरवंट व त्यांच्या श्रमफलावर टोळ पडू दिले.
४७. त्याने गारांनी त्याच्या द्राक्षवेलांचा व बर्फाने त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश केला.
४८. त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या, व जनावरे विजांच्या हवाली केली.
४९. त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नी, क्रोध, रोष व संकट ह्या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडली.
५०. त्याने आपल्या कोपासाठी मार्ग सिद्ध केला; त्याने त्यांचा जीव मृत्यूपासून वाचवला नाही, तर त्यांचा प्राण मरीच्या हवाली केला.
५१. त्याने मिसर देशातले प्रथमजन्मलेले सर्व, हामाच्या डेर्यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल ह्यांना मारले;
५२. पण त्याने आपल्या लोकांना मेंढरांसारखे बाहेर आणून त्यांना कळपाप्रमाणे रानातून नेले.
५३. त्याने त्यांना सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत, त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले.
५४. त्याने त्यांना आपल्या पवित्र प्रदेशाकडे, आपल्या उजव्या हाताने मिळवलेल्या डोंगराकडे आणले.
५५. त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रे हाकून लावली, त्यांच्या राहण्याच्या जागा सूत्राने मापून त्यांना वतन म्हणून वाटून दिल्या, आणि त्यांच्या तंबूंत इस्राएलाचे वंश वसवले.
३. भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो.
२२. पण शौलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिष्कात राहणार्या यहूदी लोकांना कुंठित करत राहिला.
२३. असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला;
२४. पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरता रात्रंदिवस वेशींवर पाळत ठेवली होती;
२५. परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीत बसवून गावकुसावरून खाली उतरवले.
२६. मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा प्रयत्न करू लागला; परंतु ‘हा शिष्य आहे’ असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते.
२७. तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्याने त्यांना सांगितले.
२८. तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे;
२९. शिवाय तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करत असे; म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले.
३०. बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले व पुढे तार्सास पाठवले.
३१. अशा प्रकारे सर्व यहूदीया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.
३२. मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला.
३३. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता.
३४. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तेव्हा तो तत्काळ उठला.
३५. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले.
३६. यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस१ ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.
३७. पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले.
३८. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे येण्यास उशीर करू नका.”
३९. तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली.
४०. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, “टबीथे, ऊठ.” तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली.
४१. मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले.
४२. हे सर्व यापोमध्ये माहीत झाले; आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
४३. नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide