बायबल एकाच वर्षात मार्च १७नंबर ३१:१-५४१. परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला:२. “मी इस्राएल लोकांना मिद्यान्यांचा सूड घ्यायला मदत करीन. मोशे, तू त्यानंतर मरशील.”१०१३. तेव्हा मोशे लोकांशी बोलला. तो म्हणाला, “तुमच्यातल्या काहींची सैनिक म्हणून निवड करा. परमेश्वर त्यांचा उपयोग मिद्यान्याचा सूड घेण्यासाठी करील.४. इस्राएलच्या प्रत्येक वंशातून १००० लोक निवडा.५. म्हणजे इस्राएलमधून १२,००० सैनिक होतील.”६. मोशेने त्या १२,००० लोकांना लढाईवर पाठवले. त्याने त्यांच्याबरोबर याजक एलाजारचा मुलगा फिनहास याला पाठवले. फिनहासने बरोबर पवित्र गोष्टी, रणशिंगे आणि तुताऱ्या घेतल्या.७. लोक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर लढले. त्यांनी सर्व मिद्यानी पुरुषांना मारले.८. त्यांनी जे लोक मारले त्यांत अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामलांही तलवारीने मारले.९. इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रियांना व मुलांना कैद करुन नेले. त्यांनी त्यांच्या गायी. मेंढ्या व इतर गोष्टीही नेल्या.१०. त्यांनी त्यांची सर्व शहरे व खेडीही जाळली.११. त्यांनी त्यांची सर्व माणसे. पशू घेतले आणि त्यांना१२. मोशे, याजक एलाजार आणि इस्राएलच्या इतर लोकांकडे आणले. त्यांनी युद्धात ज्या गोष्टी घेतल्या त्या सर्व इस्राएलींच्या तळावर आणल्या. इस्राएलचा एक तळ यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाबमध्ये होता. हा तळ यार्देन नदीच्या पूर्वेला यरीहोपलीकडे होता.१३. नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर गेले.१४. मोशे सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला. तो युद्धावरुन परतलेल्या १००० सैनिकांच्याप्रमुखावर आणि १०० सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला.१५. मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही स्त्रियांना जिवंत का ठेवले?१६. या स्त्रिया इस्राएलच्या पुरुषांसाठी वाईट आहेत. लोक परमेश्वरा पासून दूर जातील. बलामच्या वेळी झाले तसे होईल. परमेश्वराच्या लोकांना पुन्हा रोगराई येईल.१७. आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कुठल्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.१८. आणि नंतर तुमच्या पैकी ज्यांनी दुसऱ्यांना मारले असेल त्यांनी सात दिवस तळाच्या बाहेर राहावे.१९. तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर राहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा.२०. तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.”२१. नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे,२२. ***२३. ***२४. सातव्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. नंतर तुम्ही शुद्ध व्हाल त्यानंतर तुम्ही तळावर येऊ शकता.”२५. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,२६. “सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.२७. नंतर युद्धावर गेलेल्या सैनिकांत आणि इस्राएलच्या इतर लोकांत त्यांची वाटणी करा.२८. युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भाग वेगळा करा. तो भाग परमेश्वराचा आहे. परमेश्वराचा ५०० वस्तूत १ वस्तू असा भाग आहे. त्यांत माणसे, गायी, गाढवे व मेंढ्या यांचा समावेश आहे.२९. युद्धावरून सैनिकांनी आणलेल्या लुटीचा त्यांच्यातला अर्धा भाग घ्या. नंतर त्या वस्तू याजक एलाजारला द्या. तो भाग परमेश्वराचा आहे.३०. नंतर लोकांच्या अर्ध्या भागातील प्रत्येक ५० वस्तू मधील एक वस्तू घ्या. त्यात माणसे, गायी, गाढवं, बकऱ्या व इतर प्राणी यांचा समावेश आहे. तो भाग लेवी लोकांना द्या. कारण लेवी लोक परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतात.”३१. म्हणून मोशे आणि एलाजारने परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे केले.३२. सैनिकांनी ६७५००० बकऱ्या,३३. ७२,००० गायी,३४. ८१,००० गाढवे३५. आणि ३२,००० स्त्रियां आणल्या. (यांत कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध न आलेल्या स्त्रियांचाच फक्त समावेश आहे)३६. युद्धावर गेलेल्या सैनिकांना ३३७५०० मेंढ्या मिळाल्या.३७. त्यांनी ६७५ मेंढ्या परमेश्वराला दिल्या.३८. सैनिकांना ३६,००० गायी मिळाल्या. त्यांतील ७२ गायी त्यांनी परमेश्वराला दिल्या.३९. सैनिकांना ३०,५०० गाढवे मिळाली. त्यांतील ६१ गाढवें त्यांनी परमेश्वराला दिले.४०. सैनिकांना १६,००० स्त्रीया मिळाल्या. त्यांपैकी ३२ त्यांनी स्त्रीया परमेश्वराला दिल्या.४१. मोशेने परमेश्वराच्या या सर्व भेटी त्याच्या आज्ञेनुसार याजक एलाजारला दिल्या.४२. नंतर मोशेने लोकांतल्या हिश्श्याच्या अर्ध्या भागाची मोजणी केली. हा युद्धावर गेलेल्या सैनिकांकडून मोशेने घेतलेला अर्धा भाग होता.४३. लोकांना ३३७,५०० मेंढ्या.४४. ३६,००० गायी,४५. गाढवे ३०,५००४६. आणि १६,००० स्त्रिया मिळाल्या.४७. प्रत्येक ५० वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यांत पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतली.४८. नंतर सैनिकांचे पुढारी (१००० सैनिकांचे व १०० सैनिकांचे पुढारी) मोशेकडे आले.४९. त्यांनी मोशेला सांगितले, “आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.५०. म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेशवराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत-बाजूबंद, बांगड्या, आंगठ्या, कुड्या आणि हार. आम्हाला शुद्ध करण्यासाठी या परमेशवराच्या भेटी आहेत.”५१. मोशेने सोन्याच्या सर्व वस्तू घेतल्या आणि त्या याजक एलाजारला दिल्या.५२. हजार आणि शंभर सैनिकावरच्या प्रमुखांनी जे सोने परमेश्वरला दिले त्याचे वजन ४२० पौंड होते.५३. सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वत:जवळ ठेवल्या.५४. मोशे आणि एलाजार यांनी हजार आणि शंभर सैनिकांवरच्या प्रमुखांकडून सोने घेतले. नंतर त्यांनी ते सोने दर्शन मंडपात ठेवले. ही भेट म्हणजे इस्राएल लोकांनी परमेश्वराला आठवणी खातर दिलेली भेट होती.नंबर ३२:१-४२१. रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे खूप गायी होत्या. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गायींसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.२. म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.३. ***४. ***५. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तो प्रदेश आम्हाला देण्यात यावा असे आम्हाला वाटते. आम्हाला यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नका.”६. रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांना मोशे म्हणाला, “स्वत: इथे राहून तुम्ही तुमच्या भावाना लढायला पाठवाल का?७. तुम्ही इस्राएल लोकांना का निरूत्साहित करीत आहात? तुम्ही त्यांना नदी पार करण्याच्या इच्छेपासून परावृत कराल आणि परमेश्वराने त्यांना दिलेली जमीन तुम्ही घ्याल.८. तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्याबाबतीत केली होती. कादेश-बर्ण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले.९. ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांना परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.१०. परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. परमेश्वराने ही शपथ घेतली:११. ‘मिसर देशातून आलेल्या २० वर्षांवरील कुठल्याही माणसाला हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्याना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते. परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही. म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही.१२. फक्त यफुन्नेचा मुलगा कारेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वराला अनुसरले.”१३. “परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. म्हणून परमेशवराने त्यांना ४० वर्षे वाळवंटात ठेवले. ज्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले त्या लोकांना परमेश्वराने मरण येईपर्यंत तिथे ठेवले.१४. आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का?१५. जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांना अधिक काळ वाळवंटात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.”१६. पण रऊबेनच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, “आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.१७. त्यामुळे आमची मुले या ठिकाणी राहाणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलच्या इतर लोकांना मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.१८. इस्राएलमधल्या प्रत्येकाने त्याच्या वाट्याची जमीन घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही.१९. यार्देन नदीच्या पश्चिमेकडची कुठलीही जमीन आम्ही घेणार नाही. आमच्या वाट्याची जमीन यार्देन नदीच्या पूर्वेला आहे.”२०. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल. परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे.२१. तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रु सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे.२२. सगळा प्रदेश घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मदत केली की तुम्ही घरी जाऊ शकता. नंतर परमेश्वराला आणि इस्राएलला तुम्ही पापी आहात असे वाटणार नाही. नंतर परमेश्वर तुम्हाला ही जमीन देईल.२३. पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हाला शासन होईल याची खात्री बाळगा.२४. तुमच्या मुलांसाठी शहरे बसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा.”२५. नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, “आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.२६. आमच्या बायका, मुले आणि आमची सर्व जनावरे गिलाद शहरात राहतील.२७. पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.”२८. याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व कुटुंबप्रमुख या सर्वांनी ते ऐकले.२९. मोशे त्यांना म्हणाला, “गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्या पुढे चालतील. ते तुम्हाला प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.३०. पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना जमीन मिळेल.”३१. गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले. “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.३२. आम्ही यार्देन नदी पार करु आणि लढाईत परमेश्वरापुढे कनानच्या प्रदेशात जाऊ. आमच्या देशाचा प्रदेश यार्देन नदीच्या पूर्वेला आहे.”३३. तेव्हा मोशेने ती जमीन गादच्या, रऊबेनच्या लोकांना आणि मनश्शेच्या कुटुंबातील अर्ध्या लोकांना दिली. (मनश्शे योसेफचा मुलगा होता.) त्या प्रदेशात अमोऱ्याचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्या राज्याचा त्या भूमीत समावेश होता. त्यांत आजुबाजूच्या प्रदेशातील शहरे होती.३४. गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,३५. अटारोथ-शोफान, याजेर यागबहा,३६. बेथनिम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.३७. रऊबेनच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम.३८. नबो व बाल-मौन आणि सिबमाह ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.३९. माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादला गेले (माखीर मनश्शेचा मुलगा होता.) त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या आमोरी लोकांचा त्यांनी पराभव केला.४०. मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीरला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले.४१. मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईरची शहरे असे म्हटले.४२. नोबहने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.स्तोत्र ३५:१-८१. परमेश्वरा माझ्या लढाया लढ. माझे युध्द कर.२. परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल. ऊठ आणि मला मदत कर.३. भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी माझा पाठलाग करणान्या लोकांशी लढ परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”४. काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक.५. त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव. परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.६. परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे.७. मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.८. म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे. एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.नीतिसूत्रे १२:१-११. जर एखाद्याला चांगले व्हायचे असेल तर त्याची चूक दाखवल्यावर त्याला राग यायला नको. ज्याला चूक दाखवलेली आवडत नाही तो मूर्ख असतो.मार्क १४:५५-७२५५. मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.५६. पुष्कळांनी त्याच्याविरूद्ध खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हाती.५७. नंतर काही जण उभे राहीले आणि त्याच्या विरूद्ध साक्ष देऊन म्हणाले, “आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की,५८. “हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन.’५९. परंतु तरीही या बाबातीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.६०. नंतर मुख्य याजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरूद्ध आरोप करताहेत हे कसे?”६१. परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर मुख्य याजकाने पुन्हा विचारले, “धन्य देवाचा पुत्र तो तू रिव्रस्त आहेस काय?”६२. येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”६३. मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणांला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे?६४. तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हांला काय वाटते?” सर्वांनी त्याला मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्माविली.६५. काही जण त्याच्यावर थंुकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्के मारू लागले व त्याला म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” पाहारेकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले.६६. पेत्र अंगणात असतानाच मुख्य याजकांच्या दासींपैकी एक आली.६७. आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”६८. परंतु पेत्राने ते नाकारले, आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.६९. जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.”७०. पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”७१. पेत्र स्वत:ची निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही!”७२. आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दु:खी झाला व ढसढसा रडला. Marathi Bible 2006 Marathi Bible: Easy-to-Read Version Copyright © 2006 World Bible Translation Center