बायबल एकाच वर्षात जुलै २०एज्रा १:१-१११. यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनास स्फूर्ती दिली; तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले व लेखी फर्मानही पाठवले, ते असे:२. “पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गींचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहूदा प्रांतातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध;३. त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल - त्याच्याबरोबर त्याचा देव असो - त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.४. जो कोणी शेष राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरा म्हणून राहत असेल, त्याला तेथल्या माणसांनी चांदी, सोने, सामानसुमान व पशू देऊन साहाय्य करावे; ह्याखेरीज यरुशलेमेतील देवाच्या मंदिराकरता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावीत.” पाडाव करून नेलेले यरुशलेमेस परत येतात५. तेव्हा यरुशलेमेतील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जाण्यास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ती दिली ते यहूदा व बन्यामीन ह्यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक व लेवी उठून सिद्ध झाले.६. त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू व मोलवान वस्तू देऊन त्यांना साहाय्य केले; ह्यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.७. नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे यरुशलेमेहून आणून आपल्या दैवतांच्या देवळात ठेवली होती ती सर्व पारसाचा राजा कोरेश ह्याने बाहेर काढली.८. पारसाचा राजा कोरेश ह्याने ती मिथ्रदाथ भांडारी ह्याच्या हस्ते बाहेर काढून यहूदाचा सरदार शेशबस्सर ह्याला मोजून दिली.९. त्यांची यादी येणेप्रमाणे: सोन्याच्या तीस पराती, चांदीच्या एक हजार पराती, एकोणतीस सुर्या,१०. सोन्याचे तीस कटोरे, चांदीचे दुसर्या प्रकारचे चारशे दहा कटोरे व इतर पात्रे एक हजार.११. सोन्याचांदीची सर्व पात्रे मिळून पाच हजार चारशे होती. पाडाव झालेले लोक बाबेलहून यरुशलेमेस आले तेव्हा शेशबस्सराने ही सर्व पात्रे आणली.एज्रा २:१-७०१. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे:२. जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे:३. पारोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर,४. शफाट्याचे वंशज तीनशे बाहत्तर,५. आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर,६. पहथ-मवाबाचे वंशज, येशूवा व यवाब ह्यांच्या कुळातले दोन हजार आठशे बारा,७. एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न,८. जत्तूचे वंशज नऊशे पंचेचाळीस,९. जक्काईचे वंशज सातशे साठ,१०. बानीचे वंशज सहाशे बेचाळीस,११. बेबाईचे वंशज सहाशे तेवीस,१२. अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस,१३. अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट,१४. बिग्वईचे वंशज दोन हजार छप्पन्न,१५. आदीनाचे वंशज चारशे चौपन्न,१६. हिज्कीयाच्या वंशातला आटेर ह्याच्या कुळातले अठ्ठ्याण्णव,१७. बेसाईचे वंशज तीनशे तेवीस,१८. योराचे लोक एकशे बारा,१९. हाशूमाचे लोक दोनशे तेवीस,२०. गिबाराचे लोक पंचाण्णव,२१. बेथलेहेमाचे लोक एकशे तेवीस,२२. नटोफाचे लोक छप्पन्न,२३. अनाथोथचे लोक एकशे अठ्ठावीस,२४. अजमावेथाचे लोक बेचाळीस,२५. किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ ह्यांतले लोक सातशे त्रेचाळीस,२६. रामा व गेबा ह्यांतले लोक सहाशे एकवीस,२७. मिखमासाचे लोक एकशे बावीस,२८. बेथेल व आय ह्यांतले लोक दोनशे तेवीस,२९. नबोचे लोक बावन्न,३०. मग्वीशचे वंशज एकशे छप्पन्न,३१. दुसर्या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चोपन्न,३२. हारीमाचे वंशज तीनशे वीस,३३. लोद-हादीद व ओनो ह्यांतले लोक सातशे पंचवीस,३४. यरीहोचे लोक तीनशे पंचेचाळीस,३५. सनाहचे लोक तीन हजार सहाशे तीस,३६. याजकांपैकी: येशूवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज नऊशे बाहत्तर,३७. इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न,३८. पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस,३९. हारीमाचे वंशज एक हजार सतरा,४०. लेव्यांपैकी: होदव्याच्या वंशापैकी येशूवा व कदमीएल ह्यांच्या वंशातले चौर्याहत्तर,४१. गायकांपैकी आसाफाच्या वंशातले एकशे अठ्ठावीस,४२. द्वारपालांपैकी: शल्लूमाचे वंशज, आहेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, व शोबाईचे वंशज हे सर्व मिळून एकशे एकोणचाळीस,४३. नथीनीमांपैकी: सीहाचे वंशज, हसूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,४४. केरोसाचे वंशज, सीहाचे वंशज, पादोनाचे वंशज,४५. लबानाचे वंशज, हगबाचे वंशज, अकूबाचे वंशज,४६. हागाबाचे वंशज, शम्लाईचे वंशज, हानानाचे वंशज,४७. गिद्देलाचे वंशज, गहराचे वंशज, रायाचे वंशज,४८. रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज,४९. उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसाईचे वंशज,५०. अस्नाचे वंशज, मऊनीमाचे वंशज, नफ्सीमाचे वंशज,५१. बकबुकाचे वंशज, हकूफाचे वंशज, हर्हूराचे वंशज,५२. बस्लूथाचे वंशज, महिदाचे वंशज, हर्षाचे वंशज,५३. बर्कोसाचे वंशज, सीसराचे वंशज, तामहाचे वंशज,५४. नसीहाचे वंशज, हतिफाचे वंशज,५५. शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, हसोफरताचे वंशज, परूदाचे वंशज,५६. जालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज,५७. शफाट्याचे वंशज, हत्तीलाचे वंशज, पोखेरेथ-हस्सबाईमाचे वंशज, आमीचे वंशज,५८. सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज हे सगळे मिळून तीनशे ब्याण्णव होते.५९. तेल्मेलह, तेल्हर्षा, करूब, अद्दान व इम्मेर येथून जे वर आले ते हेच होते, परंतु ते इस्राएलातले होते किंवा नाही ह्याविषयी आपापली पितृकुळे व आपापली वंशावळी त्यांना दाखवता आली नाही.६०. दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज सहाशे बावन्न;६१. आणि याजकांच्या कुळांपैकी: हबयाचे वंशज, हक्कोसाचे वंशज, बर्जिल्लयाचे वंशज, त्याने बर्जिल्लय गिलादाच्या एका कन्येशी विवाह केला, त्यावरून त्याला त्यांचे नाव पडले.६२. ह्या सर्वांनी आपापल्या वंशावळींचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधला पण त्यांना तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजकपदावरून भ्रष्ट झाले.६३. तिर्शाथा१ त्यांना म्हणाला, “उरीम व थुम्मीम धारण करणार्या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाण्यास पात्र नाही.”६४. ही सारी मंडळी मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ होती;६५. ह्याशिवाय त्यांचे सात हजार तीनशे सदतीस दास व दासी आणि दोनशे गाणारे व गाणार्या होत्या.६६. त्यांची घोडी सातशे छत्तीस, त्यांची खेचरे दोनशे पंचेचाळीस,६७. त्यांचे उंट चारशे पस्तीस व त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.६८. पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करण्यासाठी त्यांनी स्वखुशीने अर्पणे दिली;६९. त्यांनी आपल्या शक्तीनुसार एकसष्ट हजार दारिक१ सोने पाच हजार माने१ चांदी आणि शंभर याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली.७०. ह्या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथीनीम हे आपापल्या नगरात राहिले; असे सर्व इस्राएल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले.स्तोत्र ८६:६-१०६. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या काकळुतीच्या वाणीकडे लक्ष दे.७. मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील.८. हे प्रभू, देवांमध्ये तुझ्यासमान कोणी नाही, आणि तुझ्या कृत्यांसारखी कोणतीही कृत्ये नाहीत.९. हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील.१०. कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.नीतिसूत्रे २१:१५-१६१५. न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्यांचा त्यामुळे नाश होतो.१६. ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल.कायदे २१:१८-४०१८. मग दुसर्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाच्या येथे गेला; आणि सर्व वडीलही तेथे आले.१९. तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.२०. ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत.२१. तुमच्याविषयी त्यांना असे कळवण्यात आले आहे की, तुम्ही परराष्ट्रीयांत राहणार्या सर्व यहूद्यांना मोशेचा त्याग करायला शिकवत असता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगत असता.२२. तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खचीत ऐकतील.२३. म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत;२४. त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा, आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल.२५. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीयांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी [असा काही नियम पाळू नये फक्त] मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ह्यांपासून अलिप्त राहावे.”२६. तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसर्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करत आहोत असे त्याने दाखवले.२७. ते सात दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले, आणि त्याच्यावर हात टाकून२८. आरोळी मारून म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तोच हा आहे; शिवाय ह्याने हेल्लेण्यांस मंदिरात आणून हे पवित्रस्थान विटाळवले आहे.”२९. त्यांनी इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते; त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती.३०. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली; आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले; आणि लगेच दरवाजे बंद करण्यात आले.३१. मग ते त्याला जिवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की, सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे.३२. तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले.३३. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला; मग ‘हा कोण व ह्याने काय केले’ असे तो विचारू लागला.३४. तेव्हा लोकांतून कोणी काही, कोणी काही ओरडू लागले; ह्या गलबल्यामुळे त्याला खातरीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला.३५. तो पायर्यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले;३६. कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता.३७. मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय?३८. ज्या मिसर्याने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या चार हजार मारेकर्यांना रानात नेले तोच तू आहेस की नाही?”३९. तेव्हा पौलाने म्हटले, “मी किलिकियातील तार्सकर यहूदी आहे; हलक्यासलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.”४०. त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायर्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले; आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला: Marathi Bible 2015 Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide