बायबल एकाच वर्षात सप्टेंबर १०यशया ११:१-१६१. इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;२. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजस-पणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील.३. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही;४. तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.५. नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल.६. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांना लहान मूल वळील.७. गाय व अस्वल एकत्र चरतील; त्यांचे बच्चे एकत्र बसतील; सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.८. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील.९. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.१०. त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.११. त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्यांदा सोडवील.१२. तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.१३. एफ्राइमाचा मत्सर नाहीसा होईल, यहूदाचे वैरी उच्छेद पावतील, एफ्राईम यहूदाचा हेवा करणार नाही व यहूदा एफ्राइमाशी विरोध करणार नाही.१४. ते पश्चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.१५. परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.१६. मिसर देशातून निघण्याच्या वेळी इस्राएलास जसा मार्ग झाला तसा त्याच्या अवशिष्ट लोकांना अश्शूरातून निघून जाण्यास हमरस्ता होईल.यशया १२:१-६१. त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहेस.२. पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर१ माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”३. तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्लासाने पाणी काढाल.४. त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा.५. परमेश्वरापुढे गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो.६. अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”स्तोत्र १०६:६-१८६. आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे. आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहे.७. आमच्या पूर्वजांनी मिसर देशात असताना तुझ्या अद्भुत कृत्यांकडे लक्ष दिले नाही, तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही. तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले.८. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून, त्याने आपल्या नावासाठी त्यांचे तारण केले.९. त्याने तांबड्या समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलांवरून त्याने त्यांना चालवले.१०. त्याने त्यांना त्यांचा द्वेष करणार्याच्या हातून सोडवले. शत्रूच्या हातून त्यांना मुक्त केले.११. त्यांचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यांच्यातला कोणीही उरला नाही.१२. तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला; त्यांनी त्याची स्तोत्रे गाइली.१३. तरी ते त्याची कृत्ये लवकरच विसरले; त्याच्या योजनेसंबंधाने त्यांनी धीर धरला नाही.१४. रानात त्यांची वासना अनावर झाली; ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली.१५. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला.१६. त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन ह्यांचा हेवा केला.१७. तेव्हा भूमी फाटली व तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबिरामाच्या टोळीस गडप केले;१८. त्याच्या टोळीस अग्नीने पछाडले, आगीच्या लोळाने त्या दुर्जनांना जाळून टाकले.नीतिसूत्रे २५:३-५३. उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा, व राजांच्या मनाचा थांग लागत नाही.४. रुप्यातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळणार्यासाठी त्याचे चांगले पात्र बनते.५. राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन नीतिमत्तेच्या ठायी स्थापित होईल.२ करिंथकर २:१-१७१. मी आपल्या मनात निश्चय केला होता की, दु:ख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये.२. कारण जर मी तुम्हांला दु:ख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दु:ख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे?३. तुम्हांला मी हेच लिहिले होते, ह्यासाठी की, मी आल्यावर, ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये; मला तुम्हा सर्वांविषयी असा भरवसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे.४. मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हांला लिहिले होते; तुम्ही दु:खी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.५. कोणी दु:ख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी — फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर — तुम्हा सर्वांना दिले.६. अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.७. म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा.८. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.९. हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे.१०. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे;११. अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.१२. असो; मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठायी दार उघडले;१३. तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही, म्हणून माझ्या जिवाला चैन पडेना. मग तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो.१४. जो देव आम्हांला सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो, आणि सर्व ठिकाणी आमच्या द्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रकट करतो, त्याची स्तुती असो.१५. तारणप्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत;१६. एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध, आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करण्यास कोण लायक आहे?१७. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत. Marathi Bible 2015 Copyright © 2015 by The Bible Society of India