बायबल एकाच वर्षात सप्टेंबर २०२ करिंथकर ११:१६-३३१६. मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल, तर निदान जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन.१७. अर्थात मी जे बोलतो, ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो.१८. देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.१९. तुम्ही सुज्ञ आहात म्हणून आनंदाने मूढाचे सहन करता!२०. कोणी तुमच्यावर सत्ता चालविली किंवा तुमचा गैरफायदा घेतला किंवा कोणी तुमच्याविरुद्ध डावपेच रचले किंवा तुम्हांला हीन लेखले किंवा कोणी तुमच्या थोबाडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.२१. ही गोष्ट मान्य करायला मला शरम वाटते की, अशा गोष्टी करायला आम्ही फारच भित्रे होतो!२२. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे.२३. ते अब्राहामचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे! (हे मी वेडगळासारखे बोलतो). मी अधिक कठोर परिश्रम केले आहेत. मी अधिक वेळा तुरुंगवास भोगला आहे. मी अगणित फटके खाल्ले आहेत. मी पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत सापडलो होतो - या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.२४. पाच वेळा मी यहुदी लोकांच्या हातून चाबकाचे एकोणचाळीस फटके खाल्ले.२५. तीन वेळा रोमन लोकांकडून छड्यांचा मार खाल्ला. एकदा माझ्यावर दगडफेक झाली. तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली.२६. मी किती तरी प्रवास केला. पुरांमुळे आलेली संकटे, लुटांरूमुळे आलेली संकटे, माझ्या यहुदी देशबांधवांनी आणलेली संकटे, यहुदीतरांनी आणलेली संकटे;२७. श्रम व कष्ट, किती तरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, अन्नवस्र व निवारा याविना काढलेले दिवस ह्या सर्वांमुळे मी अधिक प्रमाणात ख्रिस्ताचा सेवक आहे.२८. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांविषयी चिंता, ही आहे.२९. एखादा दुर्बळ असला, तर मलाही दुर्बलता जाणवते आणि जर एखाद्याला पाप करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले, तर मला क्लेश होत नाहीत काय?३०. जर मला प्रौढी मिरवणे भाग पडले तर मी माझ्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.३१. प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुगे कृपावंत आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.३२. मी दिमिष्क येथे होतो, तेव्हा अरीतास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरता त्या नगरावर रक्षक नेमले होते.३३. परंतु मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो. Marathi Bible (BSI) 2018 The Bible Society of India