बायबल आवृत्ती तुलना
- |
|---|
| १ |
| येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले. |
| २ |
| काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्या मनुष्याला म्हणाले, “मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” |
| ३ |
| तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!” |
| Marathi Bible MRCV 2024
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™ ग्रंथाची मालकी 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc. यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव |
| १ |
| तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला. |
| २ |
| तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.” |
| ३ |
| काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.” |
| Marathi Bible IRV 2019
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. |
| १ |
| येशू तारवात बसून सरोवराच्या पलीकडे गेला व आपल्या नगराला जाऊन पोहोचला. |
| २ |
| त्याच वेळी तेथे खाटेवर पडून असलेल्या एका पक्षाघाती माणसाला काही लोकांनी त्याच्याकडे आणले. येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.” |
| ३ |
| त्या वेळी कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करीत आहे.” |
| Marathi Bible (BSI) 2018
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र 2018 by The Bible Society of India Used by permission. worldwide |
| १ |
| तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहचला. |
| २ |
| मग पाहा, बाजेवर पडून असलेल्या कोणाएका पक्षाघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” |
| ३ |
| मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” |
| Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide |
| १ |
| येशू नावेत चढला व परत आपल्या नगरात गेला. |
| २ |
| तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्याला म्हटले. “तरुण मुला, काळजी करू नकोस. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” |
| ३ |
| नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे.” |
| Marathi Bible 2006
Marathi Bible: Easy-to-Read Version 2006 World Bible Translation Center |